निजामुद्दीन तब्लिगी परिषदेने देश हादरला, आतापर्यंत 10 लोकांचा कोरोनाने मृत्यू

निजामुद्दीन तब्लिगी परिषदेने देश हादरला, आतापर्यंत 10 लोकांचा कोरोनाने मृत्यू

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

  • Share this:

गुजरात, 01 एप्रिल : देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) खळबळ माजली आहे. या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. 2000हून अधिक लोकं या परिषदेला हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 441 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहे. आता या परिषदेमध्ये सामिल झालेल्या आणखी एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या परिषदेमुळे झालेला हा आतापर्यंतचा 10वा मृत्यू आहे. याआधी 6 लोकांचा तेलंगणात तर मुंबई, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला होता.

गुजरातमधील भावनगर येथील 70 वर्षांच्या या वृद्धाचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला. दरम्यान हा मृत रुग्ण तब्लिगी जमात परिषदेला उपस्थित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गुजरात पोलीस त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास घेत आहेत. मात्र येथील लोकं त्यांना सहकार्य करत नसल्याचे अडचण येत आहे. दरम्यान पोलिसांनी तपासात मदत न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

वाचा-मुंब्र्यातील मशिदीत सापडले 13 बांगलादेशी नागरिक, ताब्यात घेऊन केलं क्वारन्टाइन

2 हजारहून अधिक लोकं जमले होते

राजधानी दिल्लीत 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत सुमारे 1830 जणं निजामुद्दीन भागातील परिषदेत सहभागी झाले होते. स्थानिक लोकही यात जोडले गेले तर ही संख्या जवळपास दोन हजारांपर्यंत पोहोचते. दिल्ली किंवा आसपासच्या भागातील सुमारे 500 लोक येथे जमले होते. या कार्यक्रमात श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, इंडोनेशिया, इराण यासह 16 देशांमधील लोक उपस्थित होते. त्याच वेळी, देशातील अनेक राज्यांमधून लोक आले होते. हे नागरिक निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या मागील तबलीग-ए-जमातच्या मुख्यालयात थांबले होते.

वाचा-धक्कादायक, 'निझामुद्दीन रिटर्न'मधील 24 जण नगरमध्ये आढळले!

महाराष्ट्रातील 136 प्रवासी

दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते. त्यातील 24 जण हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचं समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे निझामुद्दीन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला आहे.

First published: April 1, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading