Home /News /national /

'छपाक'सारखा प्रकार, मद्यधुंद तरुणानं पत्नीसह तीन मुलांवर केला अॅसिड हल्ला

'छपाक'सारखा प्रकार, मद्यधुंद तरुणानं पत्नीसह तीन मुलांवर केला अॅसिड हल्ला

अॅसिड हल्ल्यात पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 15 जुलै: रोजच्या होणाऱ्या भांडणाला वैतागून मद्यधुंत तरुणानं आपल्या पत्नीसह मुलांवर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक गोळा झाले. त्यांनी तातडीनं पोलिसांनी घटनेची माहिती दिली. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नी आणि तीन मुलांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहिदने नशेत धुंद असताना भांडणाला वैतागून संतापाच्या भरात हे पाऊल उचललं आहे. या तरुणाला अॅसिडच्या बाटलीसह पकडण्यात आलं. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या अॅसिड हल्ल्यात पत्नी आणि तीन मुलं जखमी झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन मुलांची प्रकृती स्थिर आहे. तर 4 वर्षांच्या चिमुकल्याची आणि पत्नीची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना चंद रुग्णालयातून एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या