Coronavirus ची राजधानी दिल्लीलाही धास्ती, रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंद

Coronavirus ची राजधानी दिल्लीलाही धास्ती, रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंद

कोरोनाव्हायरसची भीती राजधानी दिल्लीलाही वाटत असल्याचं दिसत आहे. कारण दिल्लीतील महर्षी वाल्मिकी रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरी बंद करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : देशभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे आणि हा कहर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 1775हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक इतर देशांमध्येही कोरोनाव्हायरसमुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील केरळमध्येही काही लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं आढळलं आहे. त्यामुऴे या जीवघेण्या कोरोनाव्हायरसची सर्वांनीच धास्ती घेतल्याच बघायला मिळत आहे. इतकंच नाही तर विमानतळांवरही परदेशातून येणाऱ्या नागरिकांच स्कॅनिंक करूनच त्यांना विमानतळाबाहेर सोडण्यात येत आहे.

त्यातच आता कोरोनाव्हायरसची भीती राजधानी दिल्लीलाही वाटत असल्याचं दिसत आहे. कारण दिल्लीतील महर्षी वाल्मिकी रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरी बंद करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रजिस्टरमध्ये मॅन्युअली हजेरी लावण्याचं सांगण्यात आलं आहे. आणि याचं कारण म्हणजे कोरोनाव्हायरसचा आजार हा इतरांच्या संपर्कात आल्याने होतो. आणि त्याचीच काळजी म्हणून रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेला आहे.

बायोमॅट्रीक सिस्टीममध्ये हजेरी लावताना कर्मचारी आपल्या बोटांचा वापर करतात. यात जर कोणत्याही कर्मचाऱ्याला या व्हायरसची लागण झाली असेल तर ती अन्य जणांनाही होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बायोमॅट्रीक सिस्टम बंद करण्यात आली आहे.

हुश्श! वुहानहून आलेल्या 200 भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह; 17 दिवसांनी सोडलं घरी

त्यातच आता चीनमध्ये कोरोनाव्हायरसची लागण झालेले नवे 2 हजार 48 रुग्ण समोर आले आहेत. तर राष्ट्रीय स्वास्थ आयोगाच्या माहितीनुसार चीनमधील हुबेईमध्ये 100, हेनानमध्ये 2 आणि गुआंगदोंगमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर तिकडे जपानच्या योतोहामा बंदरावर डायमंड प्रिंसेस जहाजामध्ये 50 देशांमधील 3 हजार 700 नागरिक गेल्या 10 दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यामधील 1 हजार 219 प्रवासी नागरिकांची कोरोनाव्हायरसची तपासणी करण्यात आली आहे.

आता जहाजावर अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाव्हायरसची लागण होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. या जहाजावरील हाँगकाँगमधून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या जहाजामध्ये एकूण 138 भारतीय प्रवासी आहेत. या भारतीयांची जहाजावरून सुटका करण्यासाठी भारतीय एम्बेसी जपान प्रशासनाच्या संपर्कात आहे. या जहाजावरील 3 भारतीयांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं समजत आहे.

Zomato वरून ऑर्डर पडली महागात, न खाल्लेला पिझ्झा एक लाख रुपयांना

First published: February 18, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या