देशात आता दररोज होणार 3 लाख लोकांची चाचणी

देशात आता दररोज होणार 3 लाख लोकांची चाचणी

केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता दर दिवशी 3 लाख लोकांच्या चाचण्या करता येणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : देशात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच मंगळवारी केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता चाचणीची क्षमता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता दर दिवशी 3 लाख लोकांच्या चाचण्या करता येणार आहेत.

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंत 3,43,091 वर पोहोचला आहे. तर 24 तासांत 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 4, 37,283 लोकांचा मृत्यू झाला आहे.

लक्षण नसलेल्या लोकांचीही होणार कोरोना चाचणी

मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की COVID-19 च्या चाचणीची क्षमता वाढवण्यात आली असून 3 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची चाचणी कऱणं आता अधिक सोपं होऊ शकेल. लक्षण असणाऱ्यांसोबत लक्षण न दिसलेल्या लोकांचीही चाचणी करण्याचा प्रस्ताव आहे.

हे वाचा-भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया

आतापर्यंत देशात 907 कोरोनासाठी लॅबोरेट्री तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 659 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 248 खासगी क्षेत्रातील आहेत. आतापर्यंत 59 लाख 21 हजार 69 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सोमवारी 54 हजार 935 लोकांची चाचणी करण्यात आली होती.

देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठीची सर्व उपकरणे अधिक संख्येने उपलब्ध असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.

मेक इन इंडियाचा (Make in India) एक भाग म्हणून कोविड (साथीच्या रोगाचा) आजार विरूद्ध लढा देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालयांमध्ये स्वदेशी व्हेंटिलेटरचे वितरण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 3000 व्हेंटिलेटर राज्यांना वितरीत करण्यात आले आहेत.

हे वाचा-DEPRESSION मध्ये असलेल्या व्यक्ती का व्यक्त होत नाहीत? तज्ज्ञांनी दिलं कारण

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 17, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या