Home /News /national /

घाबरून रांगा लावू नका; लॉकडाउनमध्ये सुरू राहणार आवश्यक गोष्टींची दुकानं

घाबरून रांगा लावू नका; लॉकडाउनमध्ये सुरू राहणार आवश्यक गोष्टींची दुकानं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढचे 21 दिवस लॉकडाऊन असेल असं जाहीर केलं. उद्यापासून लॉक डाउन म्हणजे नेमकं काय याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या लॉकडाउनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद?

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. आता उद्यापासून पुढचे 21 दिवस हा लॉकडाउन असेल. पण ही घोषणा होताच नागरिक मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. उद्यापासून लॉक डाउन म्हणजे नेमकं काय याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांनी लॉकडाउनध्येही जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकानं बंद होणार नाहीत, हे स्पष्ट केलं. अनेक शासकीय अधिकारीही आवाहन करत होते की, पॅनिक होऊ नका. घाबरू नका. महाराष्ट्रात 22 तारखेपासून लॉक डाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीत फार फरक राहणार नाही. फक्त अनावश्यक कारणांसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांवर मात्र कारवाई होऊ शकते. यावर आहे बंदी - आवश्यक सेवा वगळता संचारबंदी आहे. - पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती एका वेळी कुठेही जमणार नाहीत. नाहीतर कारवाई होईल. - दूध, भाजीपाला, औषधं, किराणा,ब्रेड याची दुकानं उघडी राहतील, पण एकत्रित बाहेर पडण्यास मनाई आहे. - केवळ मेडिकल इमर्जन्सी वगळता इतर कारणांसाठी प्रवास करता येणार नाही. - खासगी वाहनांना या इमर्जन्सीच्या कारणांशिवाय रस्त्यावर फिरता येणार नाही. हे केलं तरी चालेल - भाजीपाला, दूध, औषधं यासाठी घराबाहेर पडण्यास बंदी नाही. पण एका वेळी एकानेच बाहेर पडावं. - खासगी डॉक्टर, क्लिनिक, मेडिकल स्टोअर्स बंद राहणार नाहीत. - डॉक्टरांच्या दवाखान्यात जायला परवानगी अन्य बातम्या सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दुकानांबाहेर मोठ्या रांगा 'या बेपर्वाईची किंमत किती मोजावी लागेल याचा अंदाज लावणंसुद्धा कठीण'
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या