Home /News /national /

COVID-19: 23 हजार नवीन प्रकरणं तर 811 मृत्यू, गेल्या 7 दिवसांत असा वाढला कोरोनाचा ग्राफ

COVID-19: 23 हजार नवीन प्रकरणं तर 811 मृत्यू, गेल्या 7 दिवसांत असा वाढला कोरोनाचा ग्राफ

आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मृतांचा आकडा हा वाढता आहे.

    नवी दिल्ली, 08 मे : कोरोनव्हायरसबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज आता खरे होताना दिसत आहेत. भारतात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. मे महिन्यांत कोरोनाचा प्रसार देशात वेगाने होत असल्याचे दिसत आहे. देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा आता 56 हजारांहून अधिक झाला आहे. यात गेल्या 7 दिवसांत सर्वात जास्त 23 हजार प्रकरणं समोर आली. 30 एप्रिलपर्यंत देशात एकूण 33 हजार कोरोनाबाधितांची संख्या होती. कोरोनामुळं वाढती मृतांची संख्या सध्या सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात 1075 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आता हा आकडा 1900च्या आसपास आहे, गेल्या 7 दिवसांत भारतात तब्बल 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील एकमेव आनंदाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून निरोगी रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात 8 हजार रुग्णांनी कोरोनावर मात करत निरोगी झाले होते. आता हा आकडा 16 हजारहून अधिक झाला आहे. असे असले तरी भारतात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 3390 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात कोरोनामुळं गेल्या 24 तासांत 1273 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 29.35% लोकं कोरोनावर मात देऊन बरी होत आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मृतांचा आकडा हा वाढता आहे. बुधवारी 3561 नवीन प्रकरणे समोर आली होती, तर आज 3390 प्रकरणे समोर आली आहेत. एकीकडे रुग्णांचा निरोगी होण्याचा दर वाढता आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा 28.33% हून आता 29.35% झाला आहे. काय म्हणाले तज्ज्ञ... यूनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे एपिडमियोलॉजिस्ट डॉ. बेन काउलिंग यांनी सांगितलं की, लॉकडाऊन संपल्यानंतरही आशिया खंडातील देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु शकतो. याच्या मागे दोन कारणे आहेत. लॉकडाऊन संपताच लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील आणि एकमेकांच्या संपर्कात येतील. तर दूसरे कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकतो.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या