मराठी बातम्या /बातम्या /देश /

COVID-19: कोरोनाने आजही गाठला सर्वाधिक रुग्णांचा आकडा, 24 तासांत 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण

COVID-19: कोरोनाने आजही गाठला सर्वाधिक रुग्णांचा आकडा, 24 तासांत 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला.

नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला.

नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 31 मे : भारतात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन रूग्णांनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8380 नवीन रुग्ण आढळले आणि 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 89995 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86983 लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 2,940 नवीन रुग्ण समोर आले आहेत तर 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 65,168 वर पोहोचली आहे.

देशात कोव्हिड-19 मुळे मृत्यूच्या एकूण 5164घटनांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2,197 घटना घडल्या आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 1007, मध्य प्रदेशात 343, दिल्लीत 416, पश्चिम बंगालमध्ये 309, उत्तर प्रदेशात 201 आहेत. राजस्थानमध्ये 193, तामिळनाडूमध्ये 160, तेलंगणात 77 आणि आंध्र प्रदेशात 60 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात संक्रमणामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे, पंजाबमध्ये 44 तर जम्मू काश्मीरमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनापेक्षाही मोठं संकट, तब्बल 7 लाख दुकानं बंद होण्याच्या मार्गावर

आसाममध्ये संसर्ग झालेल्या कोरोनाची संख्या 1,185 आहे

आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, शनिवारी राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 128 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि एकूण संक्रमणाची संख्या 1,185 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1,057 सक्रिय प्रकरणं आहेत.

अधिक रूग्ण असणाऱ्या मुंबईकरांना मिळाला दिलासा, पालिकेनं दिली आनंदाची बातमी

गुजरातमध्ये मृतांचा आकडा 1000 च्या वर

शनिवारी गुजरातमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे आणि संसर्गाची 412 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्याही 16000च्या वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे की, या साथीच्या आजारामुळे आणखी 27 लोकांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 1,007 वर पोचली आहे.

Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद

First published:

Tags: Corona, Corona vaccine