धक्कादायक! 'कोरोना' आयसोलेशन वॉर्डमध्ये खाण्यात आढळली झुरळं, VIDEO VIRAL
मागच्या 24 तासांत आतापर्यंत 150 नव्या रुग्णांचा समावेश झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई, 28 मार्च : देशभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. देशभरात 830 हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर काही हजार लोक निरीक्षणाखाली देशभरातील वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासांत आतापर्यंत 150 नव्या रुग्णांचा समावेश झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करेळमधील एका रुग्णालयात जिथे कोरोनाच्या रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे त्या रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्याचा व्हिडीओ एका युझरनं आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे. या युझरने त्यामध्ये या रुग्णालयातील दुरावस्था दाखवली आहे. रुग्णालयात मांजरी फिरत आहेत. अस्वच्छता पसरली आहे आणि तिथे येणाऱ्या जेवणात झुरळं असल्याचं एका महिेलेनं आपल्या ट्वीटरवर पोस्ट केलं आहे. रुग्णालयातील या दुरावस्थेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केरळमधील हे रुग्णालय असल्याचं म्हटलं जात आहे. .
This will be an unpopular thread
While #Kerala is better prepared than other states wrt #COVID19, things are falling through the cracks in the state.
शशी थरूर यांनी या व्हिडीओ रिट्विट केला आहे. 12.4 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 237 लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे तर 138 लोकांनी रिट्वीट केला आहे. 40 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. केरळमध्ये कोरोनाचे 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा द्यायचा की इथल्या अस्वच्छतेसोबत असा प्रश्न इथल्या रुग्णांना पडला आहे.