कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा! चिमुकल्यांनी साठवलेले पैसे केले दान, पाहा VIDEO

कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा! चिमुकल्यांनी साठवलेले पैसे केले दान, पाहा VIDEO

कोरोनाशी लढण्यासाठी उद्योगपतींसह दिग्गज खेळाडू, कलाकारांनीही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. दरम्यान, दोन चिमुकल्यांनी आपले साठवलेले पैसे यासाठी देऊन खारीचा वाटा उचलला आहे.

  • Share this:

भोपाळ, 28 मार्च : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय जगभरातून उद्योगपती, दिग्गज खेळाडू कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी सरसावले आहेत. यात आता मध्यप्रदेशातील नीमचमधील 2 मुलांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साठवलेले पैसे दिले आहेत. यासाठी चिमुकल्यांनी त्यांची छोटीशी भिशी फोडून पैसे दिले. हे पैसे घेऊन त्यांनी कर्जाडा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तिथं पोलिसांच्या हाती पैसे ठेवले. मुलांनी दिलेली ती मदत पाहून पोलीसही भावूक झाले.

कर्जाडा क्षेत्रातील खेडली गावात लहान मुलगा केशव परिहार याची ही मदत सध्या चर्चेत आली आहे. त्यानं साठवलेले पैसे घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि म्हणाला की, काका हे पैसे माझ्याकडून कोरोना आजारात सरकारकडे मदतीसाठी पाठवा. त्यानं हे पैसे मोदींनी केलेल्या आवाहनानंतर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं होतं की, पंतप्रधान सहाय्यता निधीत दान करा. हा सहाय्यता निधी सध्याच्या संकटासारखीच परिस्थिती भविष्यात आल्यास त्यासाठी वापरण्यात येईल. मोदींनी ट्विटच्या लिंकमध्ये सहाय्यता निधीबाबतची माहिती दिली होती. यात लहान रक्कम सुद्धा स्वीकारली जाईल असं म्हटलं होतं.

पाहा VIDEO: 'जिंदगी मौत ना बन जाए' मुंबई पोलिसांचा बाहेर न पडण्याचा 'म्युझिकल' सल्ला

देशावर ओढावलेल्या या संकटात मदतीसाठी अनेक दिग्गज सरसावले आहेत. त्यांनीही भरीव अशी मद केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी 1500 कोटी रुपयांची मदत सहाय्यता निधीत केली आहे. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 25 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

हे वाचा : खरं की खोटं : इतर देशांपेक्षा भारतात Coronavirus ची टेस्ट महाग?

First published: March 28, 2020, 11:31 PM IST

ताज्या बातम्या