भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार पार, 27 जणांचा मृत्यू तर 96 रुग्णांनी दिला यशस्वी लढा

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार पार, 27 जणांचा मृत्यू तर 96 रुग्णांनी दिला यशस्वी लढा

महाराष्ट्रात आतापर्यंत 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. आतापर्यंत 96 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत 106 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 96 जणांनी हा यशस्वी लढा दिल्यानं दिलासा व्यक्त केला जात आहे. भारतात कोरोनाची वाढणारी संख्या लक्षात घेता 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढणार का अशी एका भीतीही व्यक्त केली जात आहे.

भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत 155 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा-लॉकडाऊननंतर कोरोनाचा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग

देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. आतापर्यंत 30 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमध्ये 145 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि इटलीमध्ये कोरोना झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. 30 एप्रिलपर्यंत अमेरिकेत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.

हे वाचा-भयंकर! इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2020 08:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading