मराठी बातम्या /बातम्या /देश /

24 तासांत सापडले तब्बल 35 हजार रुग्ण, तरी 'ही' आकडेवारी दिलासादायक

24 तासांत सापडले तब्बल 35 हजार रुग्ण, तरी 'ही' आकडेवारी दिलासादायक

गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 17 जुलै : देशात कोरोनाचा वेग वेगाने वाढत आहे. संक्रमितांचा आकडा आता रोज 30 हजारांच्या घरात जात आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी 16 जुलै रोजी 32 हजार 607 रुग्ण सापडले होते. गेल्या 24 तासांत 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 22 हजार 834 रुग्ण निरोगी झाले आहेत. एकाच दिवसात निरोगी झालेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 63.3% झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 3 लाख 42 हजार 473 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 25 हजार 602 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर, आतापर्यंत 6 लाख 35 हजार 756 लोकं निरोगी झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 8,641, तामिळनाडूमध्ये 4,549, कर्नाटकात 4,169, आंध्र प्रदेशमध्ये 2,593, उत्तर प्रदेशात 2,058, पश्चिम बंगालमध्ये 1,690, तेलंगणात 1,676 आणि राजधानी दिल्लीत 1,652 नवे रुग्ण सापडले. रुग्णांची संख्या पोहचली 10 लाखांवर भारत जगभरात असा तिसरा देश जिथे कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाखावर पोहोचली आहे. अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेत 37 लाखहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत तर ब्राझिलमध्ये 20 लाख. कोरोनाचं संक्रमण आणि संसर्ग किती वेगानं वाढतोय याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात केवळ 6 दिवसांमध्ये 2 लाखहून अधिक रुग्ण वाढले आहेत. अमेरिका आणि ब्राझिलच्या तुलनेत हा संसर्ग पसरण्याचा वेग भारतात जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
First published:

Tags: Corona, Corona virus in india

पुढील बातम्या