• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Corona Virus वर आता Capsule नं होणार उपचार, ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण

Corona Virus वर आता Capsule नं होणार उपचार, ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण

आता कोरोना व्हायरसवर (Corona Virus) कॅप्सूलनं (capsule) उपचार केले जाणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: आता कोरोना व्हायरसवर (Corona Virus) कॅप्सूलनं (capsule) उपचार केले जाणार आहेत. याच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. औषध निर्माता ऑप्टिमस फार्मा( Optimus Pharma) नं गुरुवारी सांगितलं की, त्यांनी भारतात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus In India) उपचारासाठी मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलची तिसऱ्या फेज क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 18 मे 2021 रोजी, हैदराबादची फर्मला CDSCO, आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) शिफारशींनुसार चाचण्या घेणे, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI), DGHS आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. पाचव्या दिवसाच्या अभ्यासानुसार, उपचारातील 78.4 टक्के रुग्णांचे RT-PCR निगेटिव्ह आढळले, तर प्लेसिबो गटात 48.2 टक्के रुग्ण आढळलेत. हेही वाचा- BJP ला मोठा झटका, 'या' निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय निश्चित या प्रकरणी सल्लागार समितीची 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. ज्यामध्ये मर्क आणि रिजबॅकच्या सौम्य ते मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन मंजुरीसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे, उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये अभ्यासाच्या 10 व्या दिवशी 91.5 टक्के आरटी-पीसीआर निगेटिव्ह नोंदवण्यात आले आहेत. ऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, कोविड-19 साठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणं आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणं हे आमचे उद्दिष्ट आहे. हेही वाचा- जामिनाची बातमी ऐकताच अशी होती आर्यन खानची पहिली Reaction केंद्रीय परवाना प्राधिकरणासमोर फेज 3 क्लिनिकल चाचण्या सादर करणारी Optimus ही पहिली फार्मा कंपनी आहे. देशातील 29 वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाचा अभ्यास करण्यात आला. Covishield, Covaccine आणि Sputnik लस सध्या भारतात वापरली जात आहे. DCGI आणि SEC ने आतापर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, स्पुतनिक V आणि Zydus Cadila च्या लसींना परवानगी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाचे 1 लाख 60 हजार 989 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 3 कोटी 36 लाख 14 हजार 434 लोकं ठिक होऊन घरी गेले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 4 लाख 56 हजार 386 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 100 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 49 लाख 09 हजार 254 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: