मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘कोरोना’विरुद्ध WHOने दिला हा नव्या इशारा, जगाची चिंता आणखी वाढली

‘कोरोना’विरुद्ध WHOने दिला हा नव्या इशारा, जगाची चिंता आणखी वाढली

जगात आत्तापर्यंत 1 कोटी 66 लाख 90 हजार 181 जणांना कोरोना झाला आहे. तर 1 कोटी 2 लाख 75 हजार 318 जण बरे झाले आहेत.

जगात आत्तापर्यंत 1 कोटी 66 लाख 90 हजार 181 जणांना कोरोना झाला आहे. तर 1 कोटी 2 लाख 75 हजार 318 जण बरे झाले आहेत.

त्याबाबत कुठलेही पुरावे आढळून आले नसून उलट करोनामुक्त झालेल्या लोकांना पुन्हा बाधा झाल्याचं आढळून आलं आहे असं WHOने म्हटलं आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली 26 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईत जागतिक आरोग्य संघटेच्या भूमिकेवर अनेक देशांनी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर WHOने आपल्या कार्यपद्धतीत काही सुधारणाही केल्या आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांना कुठल्याही देशाने इम्यूनिटी पासपोर्ट (Immunity Passport) जारी करू नयेत असा सल्ला WHOने दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांच्या शरीरात अँटी बॉडीज तयार होतात त्यामुळे त्यांना पुन्हा लागण होण्याचा धोका राहात नाही असं म्हटलं जात होतं. मात्र त्याबाबत कुठलेही पुरावे आढळून आले नसून उलट करोनामुक्त झालेल्या लोकांना पुन्हा बाधा झाल्याचं आढळून आलं आहे असं WHOने म्हटलं आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी पूर्ण काळजी घ्यावी असं आवाहनही WHOने केलं आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना इम्यूनिटी पासपोर्ट (Immunity Passport) जारी करण्याचा विचार काही देशांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ही नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. पाकिस्तानच्या खोड्या सुरूच, भारतात प्रवेशासाठी 300 अतिरेकी तयार दरम्यान,  कोरोना प्रकरणात चीन संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सर्व जगातून चीनवर आरोप करण्यात येत आहेत. मात्र त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर उद्याप चीनने दिलेलं नाही. चीनने कोरोना व्हायरसची माहिती जगाला उशीरा दिले असा मुख्य आरोप आहे. यावरून चीनची फसवाफसवी अनेकदा उघड झाली आहे. आता चीनचा आणखी एक खोटारडेपणा उघड झाला असून त्यामुळे सगळ्या जगालाच धक्का बसला आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य जीवघेणा आजार आहे हे चीनला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कळालं होतं. मात्र त्यांनी जगापासून ही माहिती तर दडवलीच उलट या आजाराच्या औषधाच्या पेटेंटसाठीही कुणाला थागपत्ता लागू न देता अर्ज केला होता. वुहानच्या त्याच लॅबोरेटरीने अशा प्रकारचा अर्ज केला होता अशी माहिती ‘डेली मेल’ने दिली आहे. कोरोना विरुद्ध लढतांना भडकविणाऱ्यांपासून सावध राहा – मोहन भागवत या व्हायरसच्या औषधांचं पेटेंट घेऊन त्यातून पैसे कमावण्याचा डाव चीन आखत होता. मात्र नंतर सगळीच परिस्थिती बदलली. याच वुहानच्या लॅबमधून हा व्हायरस जगभर पसरला असा आरोप करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर याला वुहान व्हायरस असंही नाव दिलं होतं. ही माहिती उघड झाल्यानंतर चीनभोवतीचं संशयाचं जाळ आणखी घट्ट झालं असून सर्व जगभरातून चीनवर दबाव वाढत आहे.
First published:

Tags: Coronavirus, Who

पुढील बातम्या