Home /News /national /

Coronavirus : आजारी असल्यावर आजही देव जातात आयसोलेशनमध्ये, वाचा काय आहे ही अनोखी परंपरा

Coronavirus : आजारी असल्यावर आजही देव जातात आयसोलेशनमध्ये, वाचा काय आहे ही अनोखी परंपरा

देवालाही एकांतवासात ठेवण्याची ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू आहे.

    पुरी, 23 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्य सध्या लॉक डाऊनमध्ये आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, रुग्णांना आयसोलेशन (वेगळे) ठेवण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. मात्र भारतात ही पद्धत गेली हजारो वर्षे वापरली जात आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे रुग्णांना वेगळे ठेवले जाते. मुख्य म्हणजे भारतात देवांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्याची परंपरा आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भगवान जगन्नाथ. भगवान जगन्नाथ यांना आजारी असल्यास आजही आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. भगवान जगन्नाथ यांच्यावर केले जातात उपचार प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत भगवान जगन्नाथ आजारी असतात असे मानले जाते. याकाळात त्यांना एकांतवासात ठेवले जाते. मंदिराचे दरवाजेही याकाळात बंद ठेवले जाते. या परंपरेला अनसार असे म्हणतात. यावेळी भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यांना केवळ फळे नैवेद्य म्हणून दाखवली जातात. देवालाही एकांतवासात ठेवण्याची ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते मंदिराची साफसफाई तसेच डागडुजीसाठी मंदिर बंद करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लोकांना एकांतवासाची प्रक्रिया कळावी यासाठी देव आयसोलेशन असतात असा समज निर्माण झाला. धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, राज्यात एका दिवसात आढळले 15 नवे रुग्ण देवाचा 108 घड्यांनी पाण्याने केला जातो अभिषेक दंत कथेनुसार, राजा इंद्राद्युम्न आपल्या राज्यात देवाची मूर्ती बनवत होते, मात्र मूर्ती तयार करत असतानाच कारागीर सोडून गेला. यामुळे राजा फार दु: खी झाला. राजाला दुःखी पाहून देव प्रकट झाले आणि त्यांनी राजाला समज दिला. तसेच, मी नारद मुनी यांना वचन दिले आहे की मी पृथ्वीवर बाळरुपात विराजमान होईन. त्यानंतर देवाने राजाला 108 घडी अभिषेक करण्यास सांगितले. मावशीच्या घरी जातात देव आजही असा समज आहे की बाळाला थंड पाण्याने आंघोळ घातल्यास ते आजारी पडते म्हणूनच, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत, परमेश्वराची सेवा केली जाते. यानंतर भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा आपली मावशी रोहिणी हीला भेटण्यासाठी गुंडीचा मंदिरात जातात. परमेश्वरासाठी उत्सव आयोजित केले जातात आणि भांडी दिली जातात. मावशीच्या घरी 9 दिवस मुक्काम केल्यानंतर ते परत जगन्नाथ मंदिरात जातात. कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही तर..., WHOच्या वक्तव्याने खळबळ (ही प्राचीन परंपरा असून वरील मजकूर दंत कथेवर आधारित आहे. याचा न्यूज 18 लोकमतशी काहीही संबंध नाही)
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या