Home /News /national /

'आता पोट भरण्यापेक्षा शहर वाचवणं महत्त्वाचं’; कोरोनाशी लढण्यासाठी ऑटो घेऊन सुसाट निघाला ड्रायव्हर

'आता पोट भरण्यापेक्षा शहर वाचवणं महत्त्वाचं’; कोरोनाशी लढण्यासाठी ऑटो घेऊन सुसाट निघाला ड्रायव्हर

राजस्थानच्या (rajasthan) अजमेरमधील (ajmer) ऑटो ड्रायव्हर (auto driver) कोरोनाव्हायरसबाबत (coronavirus) जनजागृती करत आहे.

    अजमेर, 23 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (lockdown) आहे, त्यापैकीच एक राज्य आहे ते म्हणजे राजस्थान (Rajasthan). जिथं कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आणि प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला. घरात बंदिस्त झाल्यानंतर प्रत्येकाला सर्वात आधी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न पडतो मात्र अजमेरमधील (ajmer) ऑटो ड्रायव्हर (auto driver) मात्र पोटाचा विचार न करता शहर वाचवण्यासाठी निघाला आहे. 52 वर्षांचे राजेश शर्मा (rajesh sharma), जो ऑटो चालवून त्यांनी आतापर्यंत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, तोच ऑटो घेऊन कोरोनाव्हायरसपासून शहराला वाचवण्यासाठी ते निघालेत. हे वाचा - 'छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटत होतं', कोरोनाग्रस्त तरुणीने शेअर केला अनुभव राजेश यांनी आपल्या ऑटोवर लाऊडस्पीकर लावला आहे. शहरातील गल्लोगल्ली, रस्त्यारस्त्यावर फिरत ते कोरोनाव्हायरसबाबत जनजागृती करत आहेत. कोरोनाव्हायरस काय आहे, त्याच्यापासून स्वत:चा बचाव कसा कराल, कशी काळजी घ्यावी हे सांगत आहेत. तसंच सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही करत आहेत. राजेश शर्मा यांनी सरकारनं कोरोनाव्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी सांगितलेलं नाही किंवा त्यासाठी त्यांना पैसेही मिळत नाहीत. समाजहितासाठी त्यांनी हा स्वेच्छेने घेतलेला निर्णय आहे. पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचं लोकांना आवाहन केलं. शिवाय मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली, राजेश यांनी पुढाकार घेतला आणि जनजागृती करण्याचा वसा उचलला. हे वाचा - कोरोनाव्हायरसपेक्षाही दरवर्षी कित्येक लोकांचा जीव घेतात 'हे' आजार राजेंद्र सांगतात, कोरोनाव्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी डॉक्टर, नर्स, इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, तसंच पोलीस आणि मीडिया झटत आहेत. भीषण संकटातही आपला जीव धोक्यात घालून ते कोरोनाव्हायरसपासून देशातल्या जनतेचं रक्षण करत आहेत आणि अशाच समाजरक्षकांपासून आपल्याला ही प्रेरणा मिळाली. त्यामुळे आता पैशांपेक्षा आपलं शहर वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोरोनाव्हायरसपासून शहराला वाचवण्यासाठी मी स्वेच्छेने आपल्या खर्चातून हे अभियान पुढे नेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. राजस्थानमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे आणि तोपर्यंत आपलं हे अभियान सुरू ठेवण्याचा निश्चय राजेंद्र यांनी केला आहे. अशा या कोरोनायोद्धाला खरंच सलाम आहे. हे वाचा - Coronavirus पासून वाचण्यासाठी घरात असं करा सॅनिटाइझ
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या