फुफ्फुसंच नाही तर कोरोना 'या' अवयवांवरही करतो परिणाम, AIIMSच्या तज्ज्ञांचा दावा

फुफ्फुसंच नाही तर कोरोना 'या' अवयवांवरही करतो परिणाम, AIIMSच्या तज्ज्ञांचा दावा

फुफ्फुसापेक्षाही शरीरातील इतर अवयवांवर जास्त परिणाम झाल्याचं दिसून आलं, एम्समधील तज्ज्ञांचा दावा

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : कोरोनामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो आणि श्वसनाचे विकास होण्याचा धोका असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र कोरोनाचा धोका हा केवळ फुफ्फुसांनाच नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम करणार आहे असा दावा एम्समधील तज्ज्ञांनी केला आहे.

सुरुवातील कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुस आणि हृदयाचे आजार बळावण्याचा धोका सर्वाधिक आहे. श्वसनाच्या लक्षणांवरून सौम्य, मध्यम, गंभीर तीन वर्गीकरण करणं गरजेचं आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, न्यूरोलॉजिकल विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही. पद्म श्रीवास्तव, हृदय रोगशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अंबुज राय यांच्यासह आणखीन काही तज्ज्ञांनी याबाबत चर्चा केली आहे.

शरीरातील इम्युनिटी सिस्टीम खराब करतो, याशिवाय न्यूमोनियाचा धोकाही असतो. शरीरातील रक्त वाहिन्यांवर कोरोनाचे विषाणुंमुळे परिणाम होतो. किडणी, मेंदूमधील रक्ताभिसरणावरही काही वेळा होण्याची शक्यता असू शकते.

हे वाचा-100mgचे दोन डोस ठरणार कोरोना रुग्णांसाठी संजीवनी, ट्रायलमधून आली आनंदाची बातमी

एम्स रुग्णालयात असे अनेक रुग्ण पाहायला मिळाले ज्यांना फुफ्फुसापेक्षाही शरीरातील इतर अवयवांवर जास्त परिणाम झाल्याचं दिसून आलं. याशिवाय बऱ्याचदा कोणतंही लक्षण नसताना देखील कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या अनेक केसेस सापडल्या असल्याचंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

भारतात सध्या कोरोनाचा संसर्गजरी वाढत असला तरी एक दिलासा देणारी बाब म्हणजे रिकव्हरी रेट चांगला आहे. मात्र असं असलं तरीही गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा कोरोना झाल्याच्या केसेस समोर आल्यानंतर मात्र थोडी चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 27, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या