रायपूर, 03 एप्रिल : कोरोना व्हायरसनंमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. भारतात 2500 कोरोनाग्रस्त आढळले आहेत तर आतापर्यंत 76 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची भीती सगळ्यांच्या मनात आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला आपण पूर्ण बरे होऊ की नाही याची धास्ती आहे तर मरणाची भीती आहे. छत्तीसगडमधील रायपूर परिसरात एका 68 वर्षांच्या व्यक्तीनं कोरोना व्हायरसविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. त्याने इतर रुग्णांना धीर आणि कोरोनाशी लढण्याचं बळ दिलं आहे. 68 वर्षांचा व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अवघ्या 6 दिवसांच्या कोर्सनंतर त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली तेव्हा निगेटिव्ह आल्यानं त्यांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. आपण कोरोनासोबत लढू शकतो हा विश्वास माझा आधी स्वत:मध्ये निर्माण झाला त्यामुळे मी लवकर बरा झालो असं या व्यक्तीनं सांगितलं आहे.
हे वाचा-कोरोना लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फायदा, पृथ्वीचे व्हायब्रेशन झाले पूर्वीपेक्षा कमी
'ताप, सर्दी खोकला असल्यानं मला थेट रुग्णालयात उचलून नेलं. घरापासून असं कोंडून घेतल्यासारखं एकटं राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे खूप भीती वाटत होती. या दिवसांमध्ये नको ते विचार मनात येत होते पण त्यांना थारा द्यायचा नव्हता म्हणून मी मंत्रउच्चर, जप करायला सुरुवात केली. आराम केला. गाणी गुणगुणायचो देवाचं नामस्मरण करायचो मन शांत करण्याचा सतत्यानं प्रयत्न करत राहायचो. हे 6 दिवस खूप कठीण होते, दररोज तपासत होते, औषध देत होते त्यांचं ऐकणं भाग होतं कारण जीव वाचवायचा होता. खरंतर देवा इतके त्यांचे आभार मानायला हवेत .कारण आज त्यांनी माझ्या जीव वाचवला ते माझ्यासाठी देव आहेत.'
देशभरात 2500 तर महाराष्ट्रात 423 जण कोरोनाविरुद्ध लढत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील 21 जण ही लढाई हरले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही लढाई लढायची आहे आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या घरी सुरक्षित राहायला हवं. हे संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या आवाहनाचं सूचनांचं पालन करायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
हे वाचा-धारावीत डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारत सील; पाहा Photos
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.