मुंबई, 02 ऑगस्ट : देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जवळपास 50 ते 55 हजार नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 54 हजार 736 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्ताचा आकडा 17 लाख 50 हजार 724 वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 853 जणांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 37,364 वर पोहोचला आहे. देशात 5 लाख 67 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11 लाख 45 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Single-day increase of 54,735 COVID-19 cases pushes India's virus caseload to 17,50,723;death toll rises to 37,364:Govt
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
Active COVID-19 cases stand at 5,67,730, while 11,45,629 people have recovered:Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
हे वाचा-कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांचा खुलासा
केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 51 हजार 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात रिकव्हरी रेट चांगला आहे.
महाराष्ट्रात शनिवारी तब्बल 10 हजार कोरोना रुग्णांना 24 तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 9,601 रुग्ण सापडले. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असून शनिवारी 322 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15,316वर गेली असून एकूण रुग्ण 4,31,719 एवढे झाले आहेत. राज्यात 1,49,214 रुग्ण आहेत त्यातले 46,345 रुग्ण हे पुण्यात आहेत. मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 एवढा झालाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus