मुंबई, 11 जुलै: देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही. रिकव्हरी रेट चांगला असेल तरी दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाख 20 हजार पार गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासांत देशात 519 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 22 हजार 123 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 385 कोरोनाग्रस्त रुग्णांनी या व्हायरसवर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
India's COVID19 case tally crosses 8 lakh mark with 519 deaths and highest single-day spike of 27,114 new cases in the last 24 hours. Total positive cases stand at 8,20,916 including 2,83,407 active cases, 5,15,386 cured/discharged/migrated 22,123 deaths: Ministry of Health pic.twitter.com/zTiIgOyMxb
देशातील 5 राज्यांमध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या आढळली आहे. 24 तासांत महाराष्ट्रात 7862, तमिळनाडू 3680 कर्नाटक 2313, दिल्ली 2089, तेलंगणा 1278 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील कोरोना ते कोरोनाचे दर 62.78% आहे.
आतापर्यंत कोरोना विषाणूची तपासणी झाल्यापासून गेल्या 24 तासांत प्रथमच भारताने 27,000 चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आता आणखी गडद होऊ लागलं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता अन्य शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ लागला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढण्यात आला आहे.