मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचं थैमान : देशात 24 तासात 472 नवे रूग्ण, 274 जिल्ह्यांना ग्रासलं

कोरोनाचं थैमान : देशात 24 तासात 472 नवे रूग्ण, 274 जिल्ह्यांना ग्रासलं

Bengaluru: Citizens who were quarantined at a hospital for a mandatory period of 14 days following their arrival from abroad, offer prayersas they prepare to leave after they were tested negative against COVID-19, during the ongoing nationwide lockdown, in Bengaluru, Sunday, Apr 5, 2020. 46 international travellers were quarantined at the hospital and all of them have been released. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI05-04-2020_000055B)(PTI05-04-2020_000062B)

देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसला आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे.

  नवी दिल्ली 05 एप्रिल : देशातले कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या 24 तासात 472 नवीन रूग्ण आढळून आलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषद देण्यात आलीय. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या 3774 झाली आहे. आत्तापर्यंत 79 मृत्यू झाले असून गेल्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 267 जण आजारातून बरे झालेत. तर देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसल्याची माहितीही त्यांनी दिली. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हढ्या काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेलं असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे. भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. वाचा-कोरोनाच्या संकटात चुकीचे मेसेज पाठवणं पडलं महागात; 14 जणांना अटक, 3 वर्षांची शिक्षा
   भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही गेल्या महिन्याभरात सर्वात जास्त झाली. 30 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत भारतात केवळ 5 कोरोनाचे रुग्ण होते. मात्र पुढच्या 8 दिवसात ही संख्या 50 झाली. तर, एका महिन्यात ही संख्या 2500पर्यंत पोहचली. त्यामुळं 2 मार्च ते 2 एप्रिल या 30 दिवसात भारतात तब्बल 2495 रुग्णांची वाढ झाली.
  तर, 2 दिवसात एक हजारहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याच, लॉकडाऊननंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona virus in india

  पुढील बातम्या