...आणि त्याने आयुष्य संपवलं, बँक मॅनेजरच्या आत्महत्येचा थरारक VIDEO

...आणि त्याने आयुष्य संपवलं, बँक मॅनेजरच्या आत्महत्येचा थरारक VIDEO

ग्रामीण बँकेत मॅनजर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीनं 6 व्या मजल्यावरून घेतली उडी.

  • Share this:

मुरादाबाद, 30 ऑगस्ट : देशभरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 4 दिवसांपासून सातत्यानं 76 हजारहून अधिक नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. गुरुवारी रात्री कोरोनाग्रस्त रुग्णानं रुग्णालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

कोरोनाग्रस्त रुग्णानं आत्महत्या करतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 6 व्या मजल्यावरील खिडकीतून या रुग्णानं आत्महत्या केली. एका आठवड्यात या रुग्णालयातील रुग्णानं आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात वळवळत होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरही झाले हैराण

42 वर्षीय मृत व्यक्तीची ओळख राजेश असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर तातडीनं पोलीस रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी तपास केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. राजेश मुरादाबादमध्ये भाड्यानं राहात होते. ग्रामीण बँकेत मॅनजर पदावर ते काम करत होते.

अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजेश यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं खूप त्रस्त होते. त्यांनी याच भीती आणि तणावातून आयुष्य संपवल्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 30, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या