Home /News /national /

सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर, शोपियानमधील चकमकीत 4 दहशतवादी ठार

सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर, शोपियानमधील चकमकीत 4 दहशतवादी ठार

मेलहूरा इथे दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. सध्या या परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

    श्रीनगर, 22 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाच भारतीय सैन्याला घुसखोरांविरोधातही लढाई लढावी लागत आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरामध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चममकीदरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. सुरक्षा दल आणि जवानांच्या चमकीत आधी दोन दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होता. मेलहूरा इथे आणखीन दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्ज ऑपरेशन जारी करण्यात आलं. हे वाचा- 'लॉकडाउन'मुळे जंगलात रंगला शिकारीचा डाव, रानडुक्कर गोळ्या झाडून ठार मारले मेलहूरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला घेराव घातला. त्याचवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान या परिसरात आणखीन घुसखोर किंवा दहशतवादी लपून बसले आहेत का? याचा जवानांकडून शोध सुरू आहे. हे वाचा-नराधम बापाने पोटच्या लेकीवर केला वारंवार बलात्कार, बारामती हादरलं संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या