मुंबई, 20 ऑक्टोबर : संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात आला. अनेक महिन्यांच्या निर्बंधांनंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र अजूनही देशावरील कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही. अशातच काही नागरिक बेफिकीर होत कोरोनाबाबतच्या खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
'लॉकडाऊन संपला असला तरीही कोरोना व्हायरस संपलेला नाही. अनेक लोकांनी कोरोना संपला आहे असं समजून काळजी घेणं सोडलं आहे किंवा कमी केलं आहे. परंतु जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत काळजी घ्यावी लागणार,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- देशात रिकव्हरी रेट चांगला आहे
- इतर देशांच्या तुलनेत देशवासीयांचे प्राण वाचवण्यात आपण अधिक प्रमाणात यशस्वी ठरलो
- लॉकडाऊन संपला आहे व्हायरस नाही
- व्हायरस वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल
- बेफिकीर होण्याची ही वेळ नाही
- कोरोना गेला असं समूज नका, कोरोनाचा धोका अजून ही कायम
- ही वेळ निष्काळजीपणाची नाही
- बेजाबदार लोक कुटुंबालाही धोक्यात टाकतात
- भारतात कोरोनाचा अनेक लसींवर काम सुरू
- प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे कित्येक महिन्यानंतर भारतात साथ आटोक्यात येत आहे.
- कोरोनाविरोधात लस येत नाही तोवर लढा सुरू ठेवावा लागणार
- लस विकसित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू