Home /News /national /

बापरे... देशात कोरोनाची कम्युनिटी लागण? सरकारची चिंता वाढली

बापरे... देशात कोरोनाची कम्युनिटी लागण? सरकारची चिंता वाढली

Ghaziabad: Migrants board a bus to their native village, during a nationwide lockdown imposed in the wake of coronavirus pandemic, at Ghazipur Delhi - UP border, Ghaziabad, Saturday, March 28, 2020. (PTI Photo/Vijay Verma) (PTI28-03-2020_000065B)

Ghaziabad: Migrants board a bus to their native village, during a nationwide lockdown imposed in the wake of coronavirus pandemic, at Ghazipur Delhi - UP border, Ghaziabad, Saturday, March 28, 2020. (PTI Photo/Vijay Verma) (PTI28-03-2020_000065B)

हे सर्व असे लोक आहेत ज्यांची विदेशात गेल्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. किंवा ज्यांना लागण झाली अशा लोकांच्या थेट संपर्कात हे लोक आलेले नव्हते.

    नवी दिल्ली 28 मार्च : देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता होती ती या व्हायरची समाजात पसरण्याची. त्यालाच कम्युनिटी लागण असंही म्हटलं जातं. ती अतिशय गंभीर अशी परिस्थिती असते. त्याचे संकेत आता मिळू लगाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून त्याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट पणे सांगितलं गेलं नाही. मात्र काही आकडेवारीवरून याचा अंदाज येवू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. श्वास घ्यायला ज्यांना त्रास होत आहे अशा 110 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातल्या 12 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हे सर्व असे लोक आहेत ज्यांची विदेशात गेल्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. किंवा ज्यांना लागण झाली अशा लोकांच्या थेट संपर्कात हे लोक आलेले नव्हते. त्यामुळे कोरोनाने आता समाजात हातपाय पसरायला सुरुवात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही तज्ज्ञांचं मत आहे. सरकार आणि प्रशासनाकडून लोकांना आपल्या घरामध्येच थांबण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. कारण कोरोना अतिशय झपाट्याने पसरतो असं जगभरात दिसून आलं आहे. पण कम्युनिटी लागण झाली हे आत्ताच सांगता येणार नाही असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. भारतात (India) 12 तासांत कोरोनाव्हायरचे (Coronavirus) तब्बल 74 रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 917 वर पोहोचली आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या आता एकूण 20 झाली आहे. Good News: यवतमाळमध्ये ‘कोरोना’चे 3 रुग्ण ठणठणीत, आज झाली सुट्टी शनिवारी सकाळी 7 वाजता देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी 843 होती. आतापर्यंत ही आकडेवारी तब्बल 917 वर पोहोचली आहे. म्हणजे अवघ्या 12 तासात कोरोनाव्हायरसचे तब्बल 74 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनाव्हायरसच्या मृतांचाही आकडा वाढला आहे. हैदराबादमधील खैरताबादमधील एका 74 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील कोरोनाव्हायरमुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. हे वाचा - कल्याण-डोंबिवली आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण, लग्न सोहळ्यात एकाला झाली लागण भारतातील एकूण 917 रुग्णांपैकी 819 अॅक्टिव्ह केसेस आहेत, 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 79 रुग्ण बरे झालेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील हा आकडा आता 169 वर पोहोचला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या