मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING: भारतात Corona Vaccine लाँचिंगचा मुहूर्त ठरला?

BREAKING: भारतात Corona Vaccine लाँचिंगचा मुहूर्त ठरला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. कधी उपलब्ध होणार देशात (Corona Vaccine) कोरोना लस?

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
नवी दिल्ली, 7 डिसेंबर : गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात (Covid Vaccine) महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आशा वाढलेली आहे. त्यातच ब्रिटनमध्ये सोमवारपासून लसीकरणालाही सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोना लस कधी उपलब्ध होणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. मोदी सरकारने लसीकरणाला (Coronav Vaccine Launch date in India) परवानगी द्यायचा मुहूर्त ठरवला असल्याची बातमी आली आहे. पुढच्या थोड्याच दिवसांत, 2021 च्या आधीच भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. CNBC ने दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तानुसार, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आणि फायझर (Pfizer) या कंपन्यांनी लशीच्या  वापराला परवानगी देण्यासंदर्भात DCGI कडे अर्ज केला आहे.   गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे आला असून त्यावर तातडीने विचारविनिमय सुरू आहे. या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय दोन आठवड्यात होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. याचा अर्थ ख्रिसमसच्या आसपास भारतात कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबरचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 22 ते 26 डिसेंबरदरम्यान या दोन्ही लशींना परवानगी मिळून देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Narendra modi

पुढील बातम्या