राजपथावर महाराष्ट्राने चित्ररथावर साकारला शिवराज्याभिषेक दिन

राजपथावर महाराष्ट्राने चित्ररथावर साकारला शिवराज्याभिषेक दिन

महाराष्ट्राच्या चित्ररथावर शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती होती

  • Share this:

 26 जानेवारी: भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह  दिसतो आहे.   यंदा सांस्कृतिक चित्ररथामध्ये महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती साकारली. तसंच गुजराथ कर्नाटकनेही छान चित्ररथ साकारले.  10 आसियान  देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडलं.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री सीतारमण आणि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी अमर ज्योतीवर शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपतीं कोविंद यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र त्यांच्या वीरपत्नींना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. डोळ्यांच पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमास राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर करण्यात आले.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर  शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती  होती  त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले होते. आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आलं होतं. तर दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे होते. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ. एकूणच या चित्ररथाची संकल्पना कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली. यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.

 

याशिवाय गुजरातने गांधीजींवरचा चित्ररथ साकारला तर कर्नाटक त्रिपुरा आसियाान परिषदेचे चित्ररथही लोकांच्या पसंतीस उतरले.  यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज संभाजी राजे छत्रपती उपस्थित होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 08:08 AM IST

ताज्या बातम्या