कोटा, 27 ऑगस्ट : राजस्थानमधील (Rajasthan) कोटा (kota) जिल्ह्यात कोरोना संसर्ग (Coronavirus) ग्रामीण भागांमध्येही पसरू लागला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असताना गावकऱ्यांमध्ये याची भीती निर्माण झाली आहे. यातूनही एक विचित्र घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने येथील खतौली भागातील गुवाडी गावातील 90 टक्के घरांवर टाळं लागलं आहे.
या गावातून (migrate) लोक गायब झाले आहेत. जेव्हा आज दुपापी 1:30 वाजता इटावा ब्लॉकचे सीएमएचओ मेडिकल टीम (medical team) घेऊन ग्रामीण भागात रँडम सॅंपल (Random sample) घेण्यासाठी गावात पोहोचले तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला.
पहाटे 4 वाजता गावकरी गेले पळून
गावात मोजकेच लोक शिल्लक राहिले आहेत. त्यांनी सांगितले की लोक आज पहाटे 4 वाजता गायब झाले, त्याकारणाने त्यांच्या घराबाहेर टाळं लागलं आहे. गावकऱ्यांकडून ही बाब ऐकल्यानंतर मेडिकल टीम आणि ब्लॉक सीएमएचओ डॉ. यादवेंद्र शर्मा चकीत झाले. डॉ. यादवेंद्र शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट रोजी गुवाडी गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गावात 21 ऑगस्ट रोजी तब्बल 40 लोकांचे सँपल घेण्यात आले होते. त्यानंतर गावातील 11 व्यक्ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मेडिकल टीमने 7 जणांना तत्काळ कोटा न्यू मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भर्ती केलं होतं. मात्र चार महिला आपल्या घरातून गायब झाल्या. त्यानंतर इटावा उपखंडचे अधिकारी राम अवतार बरनाला यांनी त्यांना समज देत रुग्णालयात भर्ती केलं होतं.
आज जेव्हा मेडिकल टीम कोणतीही सूचना न देता गावात कोरोना सँपल घेण्यासाठी पोहोचले तर गावकऱ्यांनी आपल्या घराला टाळं लावलेलं होतं. शेतातही गावकरी काम करताना दिसले नाहीत. आतापर्यंत या गावात 12 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india