पलवल, 7 मे : देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 42 दिवसांपासून देशभरात कोरोना योद्धे (Corona Warriors) आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहून देशसेवा करीत आहेत. मात्र त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही. कोरोना योद्ध्यांवर हल्ला केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांच्याच जीवावर उठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियमावली तयार केली आहे. मात्र असे असतानाही कोरोना योद्ध्यांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
बुधवारी रात्री तब्बल 10 ते 12 तरुणांनी पलवल येथील सिव्हील रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांवर धारदार हत्याराने हल्ला केला. यामध्ये स्टाफ नर्स आणि सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यामध्ये नर्स गंभीर जखमी झाली आहे. या तरुणांनी तब्बल दीड तास रुग्णालयातील कामकाज बंद केलं. पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. यांना तातडीने अटक करण्यात आलं नाही तर कामबंद आंदोलन करणार असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकदा कोरोना योद्ध्यांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी 21 एप्रिल रोजी फरिदाबाद येथे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय विभागाची टीम आणि आशा वर्कर्सवर हल्ला करण्यात आला होता. हरियाणात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 50000 पर्यंत पोहोचली आहे. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित -कोरोनामुळे ATMमधून पैसे काढायला भीती वाटतेय?आता शेजारच्या दुकानातूनही मिळेल रोकडकधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.