Home /News /national /

केरळमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच; आता लागणार कडक लॉकडॉऊन!

केरळमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच; आता लागणार कडक लॉकडॉऊन!

केरळमध्ये कोरोना नियमांची सर्रास पायामल्ली होताना दिसते आहे. केरळमध्ये तिसरी लाट आली असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी केंद्रातील मोदी सरकार राज्यात लॉकडॉऊन लावण्याच्या तयारीत आहे.

    दिल्ली, 1 सप्टेंबर : देशात कोरोना संक्रमण (Corona Virus) सातत्याने कमी होत असताना आणि कोरोना विशेषज्ञ संभाव्य तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) भाकीत करत असताना आता केरळमध्ये कोरोना नियमांची सर्रास पायामल्ली (Kerala Government) होताना दिसते आहे. केरळमध्ये तिसरी लाट आली असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi) राज्यात लॉकडॉऊन (Lockdown) लावण्याच्या तयारीत आहे. राज्यात कडक नियमं आणि पुन्हा लॉकडॉऊन घोषित केले तर रग्णसंख्या कमी होऊ शकते, असं काही जाणकारांचे मत आहे. ग्रामीण किंवा शहरी भागांत ही नियमं अधिक कडक करण्याची गरज आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असून संक्रमणाचा आलेखही वाढता असल्याने केरळमध्ये स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारने याआधीच केरळात लॉकडॉऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात केंद्रीय गृहसचिवांनीही एक विशेष बैठक बोलावली होती. ज्यात लॉकडॉऊन लावण्याबाबत चर्चा झाली. अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रकोप; बेड, स्टाफ आणि ऑक्सिजनची कमतरता आता केंद्र सरकार रहादारी आणि इतर क्षेत्रात कडक नियमावली जारी करू शकते. ज्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत तिथे कंटेनमेंट झोन बनवण्याचा विचार सुरू आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या सुचनांचे पालन केरळ सरकारकडून झालेले नाही. सरकारच्या नियोजनाअभावी संक्रमण पसरले आहे. ज्याचा विपरीत प्रभाव आता शेजारी राज्यांवरही दिसून येत आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Coronavirus, Kerala, Lockdown, Narendra modi

    पुढील बातम्या