मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron Variant चा धोका; शाळा-कॉलेजमध्ये Coronaची भीती, 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह

Omicron Variant चा धोका; शाळा-कॉलेजमध्ये Coronaची भीती, 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह

राज्यात 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्याची मोठी चिंता वाढली आहे.

राज्यात 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्याची मोठी चिंता वाढली आहे.

राज्यात 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्याची मोठी चिंता वाढली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
कर्नाटक, 05 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट Omicron ने (Omicron Variant) भारतात सर्वांत प्रथम कर्नाटक राज्यात दार ठोठावलं आहे. Omicron ची दहशत असताना राज्यात 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिक्कमगालुरू (Chikkamagaluru)जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 40 विद्यार्थी/शिक्षक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचवेळी, शिवमोग्गा येथील एका शाळेतील 29 मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. शिवमोग्गा उपायुक्त केबी शिवकुमार यांनी सांगितले की, खासगी नर्सिंग स्कूलमध्ये 29 मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रँडम सँपलिंगमध्ये ही मुले पॉझिटिव्ह आढळली असून यातील बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. हेही वाचा-  Heartbreaking! 5 मुलींसह विहिरीत उडी घेऊन आईनं संपवलं जीवन, पती म्हणतो... उपायुक्तांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलांचे रँडम सँपल घेण्यात येत आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं. शिवकुमार म्हणाले, ही मुले वेगवेगळ्या राज्यातून या खासगी नर्सिंग स्कूलमध्ये आली आहेत. आम्ही वसतिगृहाचा परिसर सील केला आहे. संस्थेतील सुमारे 29 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या घटनेनंतर परिसरात राहणाऱ्या लोकांचे नमुनेही घेण्यात आले असून तपास सुरू असल्याचं उपायुक्तांनी सांगितले. याआधी कोरोनाची झपाट्यानं वाढ होत असलेली प्रकरणे पाहता राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर सरकारनं पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. हेही वाचा- 12 लाखांचा दरोडा टाकणारा 'भूत' अटकेत; झाला धक्कादायक खुलासा या आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची दोन प्रकरणे देखील आढळून आली होती. भारतात आतापर्यंत एकूण चार ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 8,895 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, देशातील एकूण बाधितांची संख्या 3,46,33,255 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4,73,326 झाली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Karnataka

पुढील बातम्या