नवी दिल्ली, 01 जानेवारी: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसनं (corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. कोरोनाचा नव्यानं उदयास आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) कहर जगभर पाहायला मिळतोय. त्यातच भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंट रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे झपाट्यानं वाढत आहेत. दिल्लीत (Delhi) गेल्या 24 तासांत ओमायक्रॉनचे 57 नवीन रुग्ण आढळले आहेत. राजधानीत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 320 वर पोहोचली आहे. दरम्यान या व्हेरिएंटपासून कसा बचाव करावा,काय काळजी हे देखील महत्त्वाचं आहे.
कम्युनिटी स्प्रेडपासून कसा कराल बचाव?
राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. पीयूष जैन म्हणाले की, परदेशातून आलेल्या डेटावरून असे दिसून येते की, ओमायक्रॉन हे सौम्य लक्षण आहे. मात्र भारतासाठी अद्याप कोणताही डेटा नाही. दरम्यान, वृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे अद्याप धोकादायक आहे.
हेही वाचा- वैष्णोदेवी मंदिर चेंगराचेंगरी: मृत 12 भाविक 'या' चार राज्यातील
सफदरजंग रुग्णालयाचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जुग किशोर म्हणाले की, एचआयव्ही किंवा इतर कोणत्याही संसर्गाची लागण झालेल्या लोकांनी घराबाहेर जाणं टाळावं. अशा लोकांनी वेळेवर औषधे घ्यावी आणि पुरेशी झोप घ्यावी.
रुग्णालयांवर वाढू शकतो भार
होली फॅमिली हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुमित रे म्हणतात की, ओमायक्रॉनमुळे रुग्णालयांवरचा भार वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनमुळे कमी लोकांना रुग्णालयात दाखल व्हाव लागलं. दरम्यान बहुतेक देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे.
हेही वाचा- Co-WIN वर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी Live, अशी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया
ते म्हणाले की, जर फ्रान्सप्रमाणे भारतात दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असेल, आणि ओमायक्रॉनमुळे 7 पैकी 1 किंवा 8 पैकी 1 रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासल्यास तर ही संख्या खूप जास्त असेल.
राजधानी दिल्लीतली परिस्थिती
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी सांगितलं की, राजधानीतील कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी 54 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. दिल्लीत ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचा प्रसार सुरू झाल्याचंही त्यांनी सांगितले. म्हणजेच ज्या लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही त्यांनाही आता ओमायक्रॉनची लागण होऊ लागली आहे.
हेही वाचा- मला माझ्या बायकोपासून वाचवा..! पीडित व्यक्तीची कहाणी ऐकून चक्रावले पोलीसही
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी असेही सांगितले की, आता समोर येत असलेल्या बहुतेक नवीन प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. अनेक तज्ज्ञ देखील सहमत आहेत की Omicron कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा कमी गंभीर आहे. मात्र, ते टाळणं आवश्यक आहे.
पुढे तज्ज्ञ म्हणतात की, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, मात्र त्याच वेळी वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी देखील घराबाहेर जाणं टाळावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Delhi