Home /News /national /

Corona ला रोखणाऱ्या पहिल्या औषधाला मान्यता, लवकरच भारतातही मिळू शकते परवानगी

Corona ला रोखणाऱ्या पहिल्या औषधाला मान्यता, लवकरच भारतातही मिळू शकते परवानगी

Antiviral Tablets on Coronavirus

Antiviral Tablets on Coronavirus

ब्रिटनने गुरुवारी औषध उत्पादक कंपनी मर्कच्या अँटी-कोरोना औषधाला मान्यता दिली आहे. यासह ब्रिटन हा या औषधाला मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर:  जवळपास गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या (corona pandemic) संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, लाखो जणांचे जीवही गेले आहेत. सुदैवानं भारतासह विविध देशांतल्या संशोधकांना कोविड प्रतिबंधक लस तयार करण्यात यश आले. दरम्यान, ब्रिटनने गुरुवारी औषध उत्पादक कंपनी मर्कच्या अँटी-कोरोना औषधाला मान्यता दिली आहे. यासह ब्रिटन हा या औषधाला मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. हे औषध अमेरिकेच्या Merck & Co Inc. आणि Ridgeback Biotherapeutics यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA) या औषधाचा वापर सुचवला आहे. मोलानुपिरावीर (molnupiravir )हे सौम्य आणि गंभीर संक्रमणांच्या उपचारांसाठी रुग्णांना दिले जाऊ शकते. लवकरच भारतामध्ये देखील या गोळ्या उपलब्ध होणार आहेत. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोलानुपिरावीर या अँटिव्हायरल गोळ्यांच्या (Molanapuvir Antiviral Tablets) आपत्कालीन वापरास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, सीएसआयआरचे (CSIR) अध्यक्ष डॉ. राम विश्वकर्मा यांनी याबाबत माहिती दिली. 'लाइव्ह हिंदुस्तान'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डॉ. राम विश्वकर्मा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना मोलानुपिरावीरच्या भारतातल्या वापराबाबत माहिती दिली. मोलानुपिरावीर गोळी ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल. ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण होऊ शकते, अशा नागरिकांवर उपचार करण्यासाठी या गोळीचा वापर केला जाऊ शकतो. गोळीची मुख्य निर्माती असलेल्या 'मर्क' (Merck) कंपनीसोबत इतर पाच कंपन्या काम करत आहेत. त्यामुळे मोलानुपिरावीर गोळी इतर गोळ्यांच्या तुलनेत लवकर उपलब्ध होईल. भारतात लवकरच या गोळीच्या वापराला मंजुरी मिळेल, असं डॉ. राम विश्वकर्मा म्हणाले. डॉ. राम विश्वकर्मा यांनी फायझरच्या पॅक्सलोविड (Pfizer Paxlovid) या गोळीच्या उपलब्धतेबाबतही आपलं मत व्यक्त केलं. विश्वकर्मा यांच्या मते, फायझरची गोळी उपलब्ध होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. फायझर आणि मर्क या दोन्ही कंपन्यांच्या गोळ्यांमुळे कोरोना उपचारांसाठी मोठी मदत मिळणार आहे. या गोळ्या लसीकरणापेक्षा जास्त प्रभावी ठरतील, असंही ते म्हणाले. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये असलेल्या ब्रिटनने (Britain-UK) मर्कच्या मोलानुपिरावीर गोळीच्या वापरासाठी सर्वांत आधी मान्यता दिली आहे. ब्रिटननं तब्बल 4 लाख 80 हजार गोळ्यांची पहिली ऑर्डर मर्कला दिली आहे. मोलनुपिरावीर ही गोळी कोरोना विषाणूला त्याचे स्वरूप बदलण्यापासून रोखते आणि हा आजार हळूहळू कमी होतो. मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोविड -19 असलेल्या लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी या गोळ्या सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे त्याच्या क्लिनिकल चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे. दरम्यान, फायझरनं (Pfizer) आपल्या गोळीबाबत माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांची पॅक्सलोविड (Paxlovid) ही गोळी कोरोनाबाधित रुग्णांचं हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करते. अमेरिकन औषधनिर्माती कंपनी असलेल्या मर्कनं अगोदरच पाच कंपन्यांशी करार केला आहे. मर्कनं त्या कंपन्यांना मोलानुपिरावीर निर्मितीसाठी परवाना दिला आहे. फायझरदेखील मर्कच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. कारण, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी फायझरला भारतीय कंपन्यांची निर्मिती क्षमता वापरण्याची गरज भासू शकते.
First published:

Tags: Corona, Corona updates, Corona vaccine, Covid-19

पुढील बातम्या