भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; देशावर भीतीचं सावट

भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला; देशावर भीतीचं सावट

यादरम्यान कोरोना विषाणूमुळे एका भारतीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : आतापर्यंत चीनमधील तब्बल 170 लोकांचा जीव घेणारा कोरोना विषाणू (Coronavirus) भारतात दाखल झाला आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्ठी दिली आहे. हा रुग्ण केरळमधील कोणत्या भागात राहतो याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती चीनमधील वुहान विद्यापीठात शिकत होता. वुहान या शहरात कोरोना विषाय़ूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा रुग्ण कोरोना विषाणूच्या तपासणीत पॉझिटीव्ह आला आहे. सध्या या रुग्णाची तब्येत स्थिर असून तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

भारतीय रुग्णाचा मलेशियात मृत्यू

यादरम्यान कोरोना विषाणूमुळे एका भारतीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा येथे राहणाऱ्या या रुग्णाचा मलेशिया येथे मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार मलेशियातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मानिर हुसेन नावाचा हा व्यक्ती 2018 मध्ये मलेशियात गेला होता. तो तेथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करीत होता.

कोरोना व्हायरसची लक्षणं

सर्दी

ताप

खोकला

घसा खवखवणे

श्वास घेताना त्रास

डोकेदुखी

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल?

हात स्वच्छ धुवा

शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा

सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका

प्राण्यांपासून दूर राहा

First published: January 30, 2020, 2:35 PM IST

ताज्या बातम्या