CoronaVirus : टेस्ट निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केलं क्वारंटाइन, कारण...

CoronaVirus : टेस्ट निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केलं क्वारंटाइन, कारण...

भारतात कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सुरेश प्रभू यांनी पुढच्या 14 दिवसांसाठी त्यांनी क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : क्वारंटाइन कोरोनाच्या भीतीमुळे मंगळवारी एका केंद्रीय राज्य मंत्र्यांनी स्वताला क्वारंटाइन केल्याचं समोर आलं होतं. त्यानतंर आता आणखी एका खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांनी सुरक्षेमुळे हे पाऊल उचललं आहे. भारतात कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रभावामुळे पुढच्या 14 दिवसांसाठी त्यांनी क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतलाआहे.

सुरेश प्रभू नुकतेच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून परतले आहेत. भारतात परतल्यानंतर कोरोना टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आहे. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन केलं आहे. सुरेश प्रभू सेकंड शेर्पा बैठकीसाठी सौदीला गेले होते. 10 मार्चला झालेल्या बैठकीनंतर ते भारतात परतले. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील रुग्णांची संख्या 142 वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आढलले आहेत. बुधवारी पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. आहे. ती महिला फ्रान्स आणि नेदरलँडला गेली होती. आतापर्यंत महाराष्ट्रात 42 कोरोना ग्रस्त आढळले आहेत.

होम क्वारंटाइन म्हणजे काय?

कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता असेलल्यांना होम क्वारंटाइन (home quarantine) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किमान 14 दिवस होम क्वारंटाइन म्हणजे इतरांपासून वेगळं राहावं. Ventilated आणि शक्य असल्यास स्वतंत्र शौचालय असेल अशा खोलीत राहावं. जर एकाच खोलीत कुटुंबातील इतर सदस्यही राहत असतील तर किमान एक मीटर अंतर ठेवावं.

हे वाचा : कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही

First published: March 18, 2020, 10:33 AM IST

ताज्या बातम्या