Home /News /national /

दिल्ली-एनसीआर-हरियाणामध्ये रुग्णांचा आकडा आटोक्यात, मात्र `या` राज्यांनी वाढवली चिंता; काय आहे देशात Corona चा ट्रेंड?

दिल्ली-एनसीआर-हरियाणामध्ये रुग्णांचा आकडा आटोक्यात, मात्र `या` राज्यांनी वाढवली चिंता; काय आहे देशात Corona चा ट्रेंड?

भारतात तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचं दिसून आलं. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 09 मे: गेल्या दोन वर्षांपासून जगातले अनेक देश कोरोनाचा (Corona) सामना करत आहेत. भारतातदेखील स्थिती काही निराळी नाही. भारतात तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचं दिसून आलं. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने चौथ्या लाटेची (Fourth Wave) शक्यतादेखील वर्तवली जात आहे; पण अद्याप तशी स्थिती दृष्टिक्षेपात आलेली नाही. रुग्णसंख्या वाढू लागताच काही राज्यांनी काही निर्बंध लागू केले आहेत. सध्या दिल्ली एनसीआरसह (Delhi NCR) हरियाणात (Haryana) नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3207 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर कोरोनामुळे 29 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. दरम्यान 3410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; मात्र सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या 20,400 वर पोहोचली आहे. निवडणुकीत दोन उमेदवारांना मिळाली समान मतं, मग अशी झाली विजेत्याची निवड  सध्या पंजाब, झारखंड, ओडिशा, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. परंतु, मृतांचा आकडा वेगानं वाढत नसल्याने ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. देशात सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण दिल्लीत आहेत. दिल्लीत 6 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर केरळमध्ये 3 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. हरियाणात 2700, कर्नाटकात 1964 आणि उत्तर प्रदेशात 1607 सक्रिय रुग्ण असल्याचं आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) स्पष्ट केलं आहे. दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये कोरोनाची नवी लाट सुरू झाली होती. परंतु, सध्या या भागात रुग्णसंख्या जास्त नसल्याचं दिसून येतं. दिल्लीत रविवारी (8 मे 2022) 1422 कोरोनाबाधितांची नोंद झाली. हरियाणात 513 रुग्ण आढळले. याचाच अर्थ गेल्या 24 तासांत देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे दिल्ली आणि हरियाणातले आहेत. सध्या या दोन राज्यांमधला संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचं दिसत आहे. दिल्लीत या आठवड्यात 9694 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीत 9684 रुग्णांची नोंद झाली होती. हरियाणात या आठवड्यात 3616 रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यात हरियाणात 3695 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचं दिसून येत आहे. राज्यातल्या वीज संकटावर प्रश्न विचारताच ऊर्जामंत्र्यांनी काढला पळ, म्हणाले... दक्षिण भारतातल्या केरळ (Kerala) राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. एका आठवड्यात या राज्यात 2516 रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर प्रदेशात या आठवड्यात 1747 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात एका आठवड्यात कोरोनाचे 1377 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानमध्ये साप्ताहिक रुग्णसंख्येमध्ये 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात राजस्थानमध्ये 529 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यात 360 रुग्ण आढळून आले होते. कर्नाटकात एका आठवड्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34 टक्क्यांनी वाढली आहे. या राज्यात एका आठवड्यात 1021 रुग्ण आढळून आले आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases

पुढील बातम्या