कोरोनाला दीड वर्ष पूर्ण, देशात रुग्णांचा आकडा 3 कोटींच्यापार

Corona virus Updates:देशात कोरोनाची (COVID-19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला होता.

Corona virus Updates:देशात कोरोनाची (COVID-19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला होता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जून: देशात कोरोनाची (COVID-19 ) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळेही तिसऱ्या लाटेची संभाव्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 3 कोटींच्या पार गेला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला होता. त्यानंतर 17 महिन्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 3 कोटींवर (Corona Cases Cross 3 Cr)पोहोचली आहे. गेल्या 50 दिवसात एक कोटी रुग्ण सापडले आहेत. त्यावेळी देशात दुसऱ्या लाटेला नुकतीच सुरुवात झाली होती. तेव्हा एक दिवसात 4 लाख रुग्ण सापडण्याचा रेकॉर्ड आहे. ही संख्या संपूर्ण जगभरात सर्वात जास्त होती. दुसऱ्या लाटेत आटोक्यात येणं आणि व्हॅक्सिनेशनमुळे नव्या रुग्णांचा आकडा नियंत्रणात येऊ लागला. सोमवारी 42, 683 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यावेळी 81 हजार 031 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 1,167 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. जवळपास 3 महिन्यांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या खाली आहे. याआधी 23 मार्चला 47 हजार 239 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. हेही वाचा- राजकीय दबावामुळे मोदींकडे मदत मागणारे डॉ. राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल जगभरात कोरोनाच्या प्रार्दुभावात दुसऱ्या स्थानी भारत देश जगभरात कोरोनाच्या प्रार्दुभावात दुसऱ्या स्थानी आहे. सर्वात जास्त 3.44 कोटी रुग्ण अमेरिकेत असून दोन्ही देशात केवळ 44 लाख रुग्णांचा फरक आहे. अमेरिकेनं आपल्या देशात व्हॅक्सिनेशनचा वेग वाढवल्यानं तिसऱ्या लाटेला रोखण्यात यश मिळवलं आहे. सर्वात जास्त प्रभावित 5 राज्यांमध्ये 4 दक्षिण भारतातले देशात कोरोनाचे सर्वात जास्त 59 लाख रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यानंतर केरळ- कर्नाटकात 28-28 लाख, तमिळनाडूमध्ये 24 लाख आणि आंध्र प्रदेशात 18 लाख रुग्ण आढळून आलेत. सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. 17 लाख रुग्णांचा आकडा असलेलं उत्तर प्रदेश सहाव्या स्थानावर आहे. देशाची राजधानी दिल्लीत 14 लाखांहून अधिक जण संक्रमित आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published: