पुरात होडी झाली रुग्णवाहिका; पोलिसांनी दिला कोरोनाग्रस्तांना आधार, पाहा VIDEO

पुरात होडी झाली रुग्णवाहिका; पोलिसांनी दिला कोरोनाग्रस्तांना आधार, पाहा VIDEO

भारतात सध्या 7 लाख 7 हजार 668 कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

  • Share this:

गोदावरी, 24 ऑगस्ट : देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, बिहार, राजस्थान, हिमाचलमधील अनेक छोटी गावंच्या गावं महापुरात वाहून गेली आहेत. तर दुसरीकडे दक्षिण भारतातही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थित महापुरातून वाट काढत रुग्णालयापर्यंत जाणं अशक्य होत असल्याचं लक्षात आलं. महापुरातून वाट काढत अखेर पोलिसांनी या कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील डोड्डावरम गावात महापुरानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणं अशक्य झालं होतं. यावेळी तिथल्या पोलिसांनी चक्क होडीची रुग्णवाहिका केली असून त्यातून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.

हे वाचा-Corona: रशियानंतर आता 'या' देशानं लावला नंबर, आपत्कालीन स्थितीत 2 लशींना मंजुरी

भारतात कोरोनाचं संकट आहेच पण त्यासोबतच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. भारतात कोरोनाचा विस्फोट कमी होण्याचं नाव घे नाहीय. देशात आतापर्यंत 30 लाख 44 हजार 941 लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 7 लाख 7 हजार 668 लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 56 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या