मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता हेच बाकी होतं! कोरोनाला रोखण्यासाठी आयोजित केली गोमूत्र पार्टी

आता हेच बाकी होतं! कोरोनाला रोखण्यासाठी आयोजित केली गोमूत्र पार्टी

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस या विषाणूची तिव्रता वाढता आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस या विषाणूची तिव्रता वाढता आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस या विषाणूची तिव्रता वाढता आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 14 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस या विषाणूची तिव्रता वाढता आहे. यावर उपाय म्हणून हिंदू महासभेने एका अजब कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोरोनोचा प्रभाव टाळण्यासाठी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आज हिंदु महासभेच्या कार्यालयात गोमूत्र पार्टी आयोजित केली. याआधी कोरोना टाळण्यासाठी स्वामी चक्रपाणी महाराजांनी प्रथम होम-हवनही केले होते. केवळ गोमूत्र सेवन केल्यास कोरोना विषाणूचा बचाव होऊ शकतो, असा दावा चक्रपाणी यांनी केला आहे. तसेच, कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसभर भजन कीर्तनही केले जाणार आहे. चक्रपाणी महाराजांच्या म्हणण्यानुसार, पशु हत्या हे कोरोना मागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गोहत्या टाळा आणि शक्य तितक्या वेळा गोमूत्र प्या, असा सल्लाही चक्रपाणी यांनी दिला आहे. भारतात दुसऱ्या टप्प्यात आहे कोरोना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी, 'भारत Covid-19 सध्या दुसर्याल टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या पदेशातून प्रवास केलेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. व्हायरस थांबविणे सध्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे”, असे सांगत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारताकडे 30 दिवस आहेत, असेही ते म्हणाला. 30 दिवस कोरोनाला रोखल्यास तो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही. कोरोनाचे भारतात दोन बळी कोरोना व्हायरसमुळे याआधी कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी (13 मार्च) रोजी दिल्लीत आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोनोमुळे भारतात झालेल्या बळींची संख्या आता 2 झाली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती, अशी माहिती सरकारने दिली होती.
First published:

Tags: Corona, Corona virus

पुढील बातम्या