मराठी बातम्या /बातम्या /देश /बिहारमध्ये कोरोना बळींची संख्या 5500 वरून एकदम पोहोचली साडेनऊहजारांजवळ; मृत्यूदरात 73 टक्क्यांनी वाढ कशी काय?

बिहारमध्ये कोरोना बळींची संख्या 5500 वरून एकदम पोहोचली साडेनऊहजारांजवळ; मृत्यूदरात 73 टक्क्यांनी वाढ कशी काय?

उत्तर प्रदेश आणि  बिहारच्या कोरोनारुग्ण आणि बळींच्या प्रत्यक्ष संख्येत आणि जाहीर झालेल्या संख्येत तफावत असू शकते, असे अंदाज वर्तवले जात होते. पण गेल्या 24 तासांत कोरोना मृत्यूंचा आकडा 5458 वरून थेट 9429 वर पोहचलाय. का आहे हा गोंधळ?

पुढे वाचा ...

पाटणा, 10 जून : भारतात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं (Corona in India) कमी होत असली तरी मृतांचा आकडा अद्यापही चिंताजनक आहे. त्यातच बिहारमध्ये करोना मृत्यूंच्या आकड्यातील गोंधळामुळे अचानक मृतांची संख्या वाढल्याचे दिसून आलं, त्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. बिहारमध्ये (Bihar Corona Death) गेल्या 24 तासांमध्ये कोरोना मृत्यूचा आकडा 5458 वरून थेट 9429 वर पोहचलाय. मृत्यूच्या आकड्यात तब्बल 73 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. बिहारमधील या सुधारीत आकड्यांमुळे देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येतही आज मोठी वाढ दिसून आली. त्यामुळं कमी होणारी रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्याही खरंच कमी आहे की, ती कमी करून दाखवली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये कोरोनामुळं झालेल्या मृतांच्या आकड्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबत शंका खूप आधीपासूनच वर्तवली जात होती. बिहारमध्ये कोरोनाचे खरे आकडे लपवले जात आहेत. मात्र, आता सरकारी आकडेवारीमधील सावळा गोंधळाची ही बाब उघडकीस आली आहे.

बिहार सरकारकडून दर दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा जाहीर केला जातो. हे आकडे जिल्ह्यांमधून पाठवल्या गेलेल्या रिपोर्टच्या आधारावर नोंदले जातात. मात्र, आता तपासणीत असं आढळून आलं आहे की, जिल्ह्यामधून मृतांची जी संख्या पाठवली जात होती, त्यामध्ये मोठ्या संख्येने हेराफेरी केली गेली आहे.

बिहारच्या उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर 18 मे रोजी राज्य सरकारनं कोरोनामुळे झालेल्या मृतांबाबतच्या तपासासाठी जिल्ह्यांमध्ये दोन पथके बनवली. दोन्ही स्तरावरील तपासणीत आढळलंय की, मृतांचे आकडे लपवले गेले असून सरकारला देखील चुकीची माहिती पुढे पाठवली जात होती. आता याबाबत नितीशकुमार सरकारकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचा - ऑपरेशन दरम्यान डॉक्टर का परिधान करतात हिरवं कापड? तर इतर वेळी यामुळे वापरतात सफेद कोट

राज्यात करोना मृत्यूंची संख्येची लपवाछपवी होत असल्याची शंका स्थानिक मीडियातून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत होती. रुग्णालयातील मृत्यूचे आकडे आणि स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या आकड्यांत कमालीची तफावत आढळून आली होती.

First published:
top videos

    Tags: Bihar, Corona spread, Corona updates, Corona vaccine, Coronavirus