मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! कोरोनाचे 10 संशयित रुग्ण बेपत्ता, शोधण्यासाठी पोलिसांची मोहीम

धक्कादायक! कोरोनाचे 10 संशयित रुग्ण बेपत्ता, शोधण्यासाठी पोलिसांची मोहीम

कोरोना व्हायरस पीडित देशांमधून भारतात परतलेले दहाजण बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

    लुधियाना, 13 मार्च : कोरोनामुळे भारत सरकारने देशात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस पीडित देशांमधून परतलेले दहाजण पंजाबमधील लुधियाना इथून बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, 'कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी त्या दहा लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यांना त्यांच्या घरीच वेगळ ठेवता येईल.' एका अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितलं की, वेगवेगळ्या देशांमधून एकूण 480 लोक लुधियाना जिल्ह्यात परतले आहेत. मात्र यातील 10 जणांची माहिती कोणालाही मिळालेली नाही. जर एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळली तर त्या व्यक्तीला घरातच वेगळं ठेवता येईल. ज्यामुळे कोरोनाची लागण झाली असेल तर तो रोखण्यासह उपचार करता येतील. लुधियानात आतापर्यंत तीन संशयित सापडले. त्यांची चाचणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनामुळे एअर इंडियाने इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि लंकेला होणारी उड्डाणे रद्द केली आहेत. 30 एप्रिलपर्यंत कोणतेही उड्डाण होणार नाही याची माहिती एअर इंडियाने शुक्रवारी दिली. हे वाचा : जगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! कोरोनाचे 10 रुग्ण झाले ठणठणीत याबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि लंकेला होणारी उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान भारत सरकारने परदेशी नागरिकांना 15 एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यात येणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. हे वाचा : ‘कोरोना’चं थैमान, हे आहेत जगभरातले 50 Updates
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या