Home /News /national /

HIVच्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचाराचा दावा; 48 तासांत रुग्ण होईल बरा

HIVच्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचाराचा दावा; 48 तासांत रुग्ण होईल बरा

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी या देशातील डॉक्टरांनी नवं औषध तयार केलं आहे

    बीजिंग, 3 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 17,387 लोक आजारी पडले आहेत. ज्यामध्ये केवळ चीनमध्येच 17,205 लोक या व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. जगभरातील डॉक्टर कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये थायलॅंडच्या (Thailand) डॉक्टरांनी एक नवं औषध तयार केलं आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी थायलॅंडच्या डॉक्टरांनी नवं औषध तयार केलं आहे. याशिवाय या औषधाने केवळ 48 तासांत रुग्ण बरा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. थायलॅंडचे (Thailand) डॉक्टर क्रिएनसाक अतिपॉर्नवानिचनुसार या कोरोना व्हायरसने संक्रमित 71 वर्षांची वृद्ध महिलेला आम्ही आमचं नवं औषध देऊन बरं केलं. पीडित महिला औषध दिल्यानंतर पुढील 12 तासांत अंथरुनातून उठली. त्यापूर्वी तिला हलणेही शक्य होत नव्हते. केवळ 48 तासांत महिला 90 टक्के बरी झाली आहे. काही दिवसांतच तिला डिस्चार्ज दिला जाईल. HIV च्या औषधातून कोरोना व्हायरसवर उपचार थायलॅंडचे डॉक्टर म्हणाले की, हे औषध अधिक प्रभावी बनविण्यासाठी आम्ही लॅबमध्ये याचे परीक्षण सुरू केले आहे. ते म्हणाले की कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आम्ही एंटी-फ्लू ड्रग ओसेल्टामिविरचा उपयोग HIV च्या उपचारासाठी वापरली जाणारी लोपिनाविर आणि रिटोनाविर यांना मिळून नवीन औषध तयार केले आहे. थायलॅंडमध्ये कोरोना व्हायरसची 19 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी 8 रुग्णांना 14 दिवसांच्या आता बरं करण्यात आलं. उरलेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहे. काय आहेत लक्षणं कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा. चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला असून त्याव्यतिरिक्त हजारो लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या