• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Corona Virusचा पुन्हा एकदा वाढता धोका, 99 टक्के नमुन्यांमध्ये आढळलं Delta Variant

Corona Virusचा पुन्हा एकदा वाढता धोका, 99 टक्के नमुन्यांमध्ये आढळलं Delta Variant

Corona Virus Update: दिवाळी तोंडावर आली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसतोय.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona Infection) संसर्गाचा धोका वाढताना दिसतोय. दिवाळी तोंडावर आली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसतोय. दिल्ली सरकारनं (Delhi Government)ऑक्टोबर महिन्यात तपासलेल्या कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या नमुन्यांपैकी 99 टक्के रुग्णांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) आढळून आला आहे. त्याचा Sars-CoV-2 व्हायरस आढळून आला आहे, यावरून कोरोनाच्या धोक्याचा अंदाज लावता येतो. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ची स्थापना झाल्यापासून, दिल्लीतून 7,300 हून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये घेतलेल्या 54% आणि मे महिन्यात 82% नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला. जेव्हा दिल्लीत कोरोनाचा कहर होता आणि एका दिवसात 28 हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात होती. यावेळी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. समोर आलेल्या डेटानुसार, त्यावेळी घेतलेल्या एकूण नमुन्यांपैकी 39 टक्के हा डेल्टा व्हेरिएंटचा होता. हेही वाचा-  T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर Sars-Cov-2 च्या डेल्टा व्हेरिएंटनं इतक्या वेगानं लोकं संक्रमित केले की, काही आठवड्यातच त्याने अल्फा व्हेरिएंटला मागे टाकलं आणि दिल्लीत कोरोनाची सर्वात विनाशकारी लाट निर्माण केली. कोरोना विषाणूचे निरीक्षण करणार्‍या संशोधकांच्या मते, देशातील सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार अजूनही डेल्टा (B1.617.2) आहे जो जवळपास निम्म्या नमुन्यांमध्ये आढळतो, त्यानंतर AY.4 डेल्टा स्ट्रेन येतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आढळले डेल्टा प्लस AY.4.2 कोरोनाच्या डेल्टा प्लस- AY.4.2 या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि युरोपमधील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. भारतात हा प्रकार आढळून आल्यावर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे सल्लागार डॉ. सुनिला गर्ग यांनी सांगितलं की, भारतात या प्रकाराची उपस्थिती 4 महिन्यांपासून आहे, मात्र काळजी करण्यासारखे काही नाही. हेही वाचा- IND vs NZ LIVE Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार?  पुढे ते म्हणाले की, दुर्गापूजेमुळे केसेस वाढल्या आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएंटची चौकशी केली जात आहे. हा व्हेरिएंट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही आढळून आला आहे. AY.4.2 डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक कोरोना व्हायरस AY.4.2 चे नवा म्यूटेंट भारतात सापडले असले तरी त्याची संख्या खूपच कमी आहे. व्हायरसचे हे स्वरूप डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं मानलं जात आहे, कारण ते त्याच्यापेक्षा वेगाने पसरते. INSACOG नेटवर्क मॉनिटरिंग व्हेरिएशन्सच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी ही माहिती दिली. असं मानलं जातं की, AY.4.2 मुळे ब्रिटन, रशिया आणि इस्रायलमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. या स्ट्रेनमुळे मॉस्कोमध्ये पुढील आठवड्यात लॉकडाऊन लागू केलं जाणार आहे. तर इस्रायलमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: