मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाच्या विळख्यातून अखेर 'त्या' भारतीयांची सुटका; सरकारचं मोठं पाऊल

कोरोनाच्या विळख्यातून अखेर 'त्या' भारतीयांची सुटका; सरकारचं मोठं पाऊल

चीनमध्ये असलेल्या इतर देशांमधील नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरलं आहे. इतर देशांमधील लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चीनमध्ये असलेल्या इतर देशांमधील नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरलं आहे. इतर देशांमधील लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चीनमध्ये असलेल्या इतर देशांमधील नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरलं आहे. इतर देशांमधील लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. यामुळे चीनमध्ये असलेल्या इतर देशांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. इतर देशांमधील लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी हवाई दलाचे एक विमान आज चीनला रवाना झालं आहे. सी-17 हे लढाऊ विमान 80 भारतीय आणि इतर देशांमधील 40 लोकांना घेऊन परत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांचाही समावेश आहे.

जपानी जहाजावर अडकलेल्या भारतीयांनासुद्धा परत मायदेशी आणण्यात येत आहे. एअर इंडियाच्या विमानातून जहाजावरचे भारतीय दिल्लीत परतणार आहेत. याशिवाय वुहानमधील 120 प्रवाशी भारतात पोहोचतील अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आयटीबीपीच्या डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवलं जाणार आहे. छावला इथं यासाठी सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत.

जपानमध्ये जहाजावर अडकेलल्या प्रवाशांची सुटका झाली असून त्यात कोणत्याही भारतीयाला कोरोनाची लागण झाली नसल्याचं वैद्यकिय तपासणीत स्पष्ट झालं आहे. जहाजावरील 16 जणांना भारतात आणलं जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत चीनला देण्यात येईल. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरसच्या प्रसारावर आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. मंत्रालयाने म्हटलं की, विमानात 15 टन वैद्यकीय साहित्य असून त्यात मास्क, ग्लोव्हज आणि इतर साहित्य आहे.

गेल्या आठवड्यात चीनकडून विमान पाठवण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप भारताने केला होता. इतर देशांना त्यांच्या नागरिकांनी घेऊन जाण्यासाठी विमान उड्डाणाला परवानगी देत असल्याचं भारताने म्हटलं होतं. चीनने भारताचे आरोप फेटाळून लावले होते.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 2715 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 78 हजारांच्या वर पोहोचली आहे. चीनशिवाय इतर देशांमध्येही कोरोनाची दहशत पसरली आहे. फ्रान्सने त्यांच्या देशातील नागरिकाचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं म्हटलं आहे. फ्रान्समधील ती पहिलीच व्यक्ती आहे असंही सांगण्यात आलं.

वाचा : 'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव

First published:

Tags: Coronavirus