Corona Virus: डेल्टा व्हेरिएंटसमोर अँटीबॉडीजही फेल; तरुणाला 1 महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Corona Virus: कोरोनातून बरं झाल्यानंतर महिनाभरानंतरच एका व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण (Corona infection) झाली आहे. पण यावेळी कोरोनाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक होता.

Corona Virus: कोरोनातून बरं झाल्यानंतर महिनाभरानंतरच एका व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण (Corona infection) झाली आहे. पण यावेळी कोरोनाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक होता.

  • Share this:
    अहमदाबाद, 19 जून: एखादी व्यक्ती कोरोनामुक्त झाली, तर त्या व्यक्तीला किमान पुढील तीन महिने कोरोनाची लागण होतं नाही. कारण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज (Antibodies) तयार झालेल्या असतात. ज्या कोरोना विषाणूच्या (Corona virus) लढ्यात अत्यंत फायदेशीर असतात. पण गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील एक तरुण कोरोनातून पुर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला एक महिन्यानी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे. कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर तरुणाला पुन्हा कोरोना लागण कशी काय झाली? याबाबत गुजरातमधील वैज्ञानिकांनी संशोधन केलं आहे. याप्रकरणी माहिती देताना शास्त्रज्ञांनी सांगितलं की, अहमदाबाद येथील मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेश भट्ट यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवलं होतं. काही दिवसातच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मात्र, कोरोनातून बरं झाल्यानंतर महिनाभरानंतरच त्यांना कोरोना विषाणूची पुन्हा लागण झाली. पण यावेळी कोरोनाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक होता. राजेश भट्ट यांना 13 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना झाल्याची त्याची लक्षणं सौम्य असणं आवश्यक होतं. पण या प्रकरणात परिस्थितीत विरोधाभास होता. कारण कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटसमोर अँटीबॉडीज देखील फेल ठरत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हेही वाचा-चिंता वाढली! 4 सिंहांमध्ये आढळला कोरोनाचा घातक डेल्टा व्हेरियंट हे प्रकरण डोळ्यासमोर ठेवून गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिएंटनं आपलं स्वरूप बदललं असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या हल्ल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील अमीनो अ‍ॅसिड गायब झालं होतं. या व्हेरिएंटमध्ये बदल झाल्यानं विषाणूनं अँटीबॉडीला देखील चकमा देण्यात यशस्वी झाला असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: