Home /News /national /

कोरोनामुळे झाला मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आणि नंतर 'अशी' घेतली खबरदारी

कोरोनामुळे झाला मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आणि नंतर 'अशी' घेतली खबरदारी

कोरोना व्हायरस व्यतिरिक्त एचआयव्ही आणि इबोला यांचं संक्रमणही डास चावल्यानं होत नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण एकमेकांच्या संपर्कातून होतं.

कोरोना व्हायरस व्यतिरिक्त एचआयव्ही आणि इबोला यांचं संक्रमणही डास चावल्यानं होत नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण एकमेकांच्या संपर्कातून होतं.

एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. मृतदेह दफन करत असताना फक्त घरातले लोक उपस्थित होते.

    मदुराई, 26 मार्च : जगात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनामुळे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, लोकांच्या मनात कोरोनाची प्रचंड भीती आहे. तामिळनाडुतील मदुराई इथं एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराला फक्त घरातले लोक उपस्थित होते. मृतदेह दफन करण्याच्यावेळी मृत व्यक्तीची पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ होते. त्यांनीच मृतदेह दफन केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अन्ना नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा बुधवारी रात्री मृत्यू झाली. आरोग्य मंत्र्यांनी याची माहिती दिली. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेह, हायपरटेन्शनचा त्रास होता. रुग्णालयातली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पहाटेच्या सुमारास अंत्यसंसकारासाठी नेण्यात आला. मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दफनविधीसाठी खड्डा खोदण्याचं काम होईपर्यंत मृतदेह गाडीतच ठेवण्यात आला होता. कुटुंबातील सदस्यांसह मृतदेहासोबत पोलिसांचे एक पथकही सोबत होते. दफन करताना कोणतेही वैद्यकीय पथक किंवा स्वच्छता अधिकारी नव्हते. दफनविधी सकाळी पाचपर्यंत पूर्ण झाला होता. या दरम्यान जिल्हा प्रशासनाने त्या भागात जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. ज्या ठिकाणी मृत व्यक्तीचे घर होते त्या परिसरातील सर्व घरांत राहणाऱ्या लोकांवर लक्ष दिलं जात आहे. हे वाचा : जे जागे असतील तेच वाचतील, अफवा पसरली आणि अख्खं गाव रात्रभर झोपलंच नाही! पोलिसांनी सांगितलं की, त्या ठिकाणी कोणी बाहेर जाऊ नये तसंच येऊ नये यासाठी जवळपास 8 ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. फक्त रहिवाशांनाच तिथं जाण्यास परवानगी आहे. त्यासाठी रहिवाशी असल्याचा पुरावा आणि ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. याशिवाय मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला दुकानातून साहित्य तसंच अत्यावश्यक वस्तू खरेदीस परवानगी आहे. हे वाचा : मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या