सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या कोव्हिशील्ड( Oxford-AstraZeneca Covishield ) लशीला पहिल्यांदा परवानगी मिळू शकते. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा (Bharat Biotech Covaccine) नंबर लागू शकतो. 'नव्या वर्षाच्या स्वागतालाच आपल्याकडे चांगली बातमी येऊ शकते', असं सूतोवाच औषध महानियंत्रकांनी( DCGI) कालच केलं होतं. त्यानंतर आज तज्ज्ञ समितीची बैठक सुरू आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनकानं (Astra Zeneca ) तयार केलेल्या कोरोना लशीला यूकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (pune serum institue of india) या लशीत सहभाग आहे. भारतात ही लस कोव्हिशिल्ड (COVISHEILD) नावानं ओळखली जातं. याची निर्मिती आधीच झालेली आहे. भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे. नवीन कोरोनाचा धोका वाढला भारतात नवीन कोरोना व्हायरसचा (New strain of Coronavirus) संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये बदल झाल्याचं (Mutation in Coronavirus) लक्षात आलं आणि आता हा नवा अवतार जगभर पसरत आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या काही प्रवाशांमध्ये हा नवा विषाणू सापडला आहे. आता या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या आपल्या देशात 29 झाली आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus