मराठी बातम्या /बातम्या /देश /'महाराष्ट्र सरकारने दिलेलं लशींच्या तुटवड्याचं कारण हा अपयश फार्स'; कोरोना लसीकरणावरून मोदी आणि ठाकरे सरकार आमनेसामने

'महाराष्ट्र सरकारने दिलेलं लशींच्या तुटवड्याचं कारण हा अपयश फार्स'; कोरोना लसीकरणावरून मोदी आणि ठाकरे सरकार आमनेसामने

महाराष्ट्रात कोरोना लशीचा तुटवडा (Corona vaccine shortage in Maharashtra) निर्माण झाल्यानंतर मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये युद्ध रंगलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना लशीचा तुटवडा (Corona vaccine shortage in Maharashtra) निर्माण झाल्यानंतर मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये युद्ध रंगलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना लशीचा तुटवडा (Corona vaccine shortage in Maharashtra) निर्माण झाल्यानंतर मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये युद्ध रंगलं आहे.

नवी दिल्ली, 08 एप्रिल : एकिकडे कोरोनाविरोधात लढा सुरू असताना आता केंद्र आणि राज्यांमध्ये मात्र कोरोना लशीवरूनच युद्ध सुरू झालं आहे. महाराष्ट्रात कोरोना लशीचा तुटवडा (Corona vaccine shortage in Maharashtra) निर्माण झाला आहे. यानंतर  कोरोना लसीकरणावरून (Corona vaccination) मोदी सरकार आणि ठाकरे सरकार आमनेसामने आलं आहे. लशीच्या पुरवठ्यात केंद्राने महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला असा आरोप महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. तर महाराष्ट्र सरकार स्वत:चं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रत्यारोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला.

महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास दुप्पट आहे. कोरोना रुग्णांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशाच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 50 ते 55 टक्के रुग्ण ज्या राज्याला आहेत त्या राज्यामध्ये आठवड्याला 40 लाख लशींची आवश्यकता असताना केवळ साडेसात लाख डोस मिळाले आहेत आणि इतर राज्यांना 40-50 लाख लशींचं वाटप का असा साधा प्रश्न असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं. डॉ. हर्षवर्धन यांना जाणून बुजून राज्याला विरोध करायचा असं वाटत नाही, मात्र त्यांचं मॅनेजमेंट कुठंतरी चुकत असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - भयंकर! कुठे बेड्स फुल, कुठे लसीकरण बंद; तुमच्या जिल्ह्याची काय आहे स्थिती पाहा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या या आरोपांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं आहे. केंद्र सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरडाओरडा काही राज्यं करत आहेत. हे म्हणजे फक्त एक फार्स आहे. स्वतःचं अपयश लपवण्याचा हा प्रयत्न आहे, असं डॉ़. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार सर्वाधिक कोरोना लशीचे डोस पुरवलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही. त्यामुळे केंद्राने कोणताही पक्षपातीपणा केलेला नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

हे वाचा - कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार देणार 5000 रु.; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लशीच्या पुवठ्याबाबत आश्वासन दिलं असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. 15 एप्रिलनंतर 17 लाख लशी देणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्याने 30 लाख डोसचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र लवकरच 17 लाख डोस मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine