मुंबई, 08 जानेवारी : देशात आता कोरोनाच्या लशीचं दुसरं सर्वात मोठं ड्राय रन आजपासून सुरू होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारनं पूर्ण तयारी केली आहे. 700 जिल्ह्यांमध्ये जवळपास हे ड्राय रन होणार आहे. आज उत्तर प्रदेश आणि हरियाणा सोडून इतर सर्व राज्यांमध्ये हे ड्राय रन केलं जाणार आहे.
कोरोना लस मंजूर झाल्यानंतर सरकारने वाहतुकीची तयारीही पूर्ण केली आहे. वायुमार्गाद्वारे लसींच्या हालचालीसाठी सरकारने पूर्ण आराखडा तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया आज किंवा उद्यापासून देशातील अनेक विमानतळांवर सुरू होऊ शकते. मुंबईतील BKC इथे ड्राय रनची तयारी देखील पूर्ण झाली आहे. याआधी 28 आणि 29 डिसेंबरला 4 जिल्ह्यांमध्ये तसंच 2 जानेवारीला 285 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेण्यात आली होती.
Mumbai: BKC Jumbo dedicated COVID19 hospital to take part in the second nationwide vaccine dry run today pic.twitter.com/Kyxak3iZ3I
— ANI (@ANI) January 8, 2021
Tamil Nadu: Preparation underway at Rajiv Gandhi Government General Hospital in Chennai for the second dry run for COVID19 vaccine. "All the arrangements have been done. We have appointed four vaccinator officers to conduct the dry run here," says Dean of the hospital pic.twitter.com/FC9umcUKSd
— ANI (@ANI) January 8, 2021
13 जानेवारीपासून देशभरात कोव्हिड 19 च्या लसीकरणास (COVID-19 Vaccination) सुरुवात होऊ शकते. दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अॅपवर उपलब्ध करण्यात येईल, लवकरच हे अॅप डाऊनलोड केले जाईल. या अॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्णपणे फ्री असेल आणि युजर्स अत्यंत सोप्या पद्धतीने हे अॅप डाऊनलोड करू शकतात. अद्याप गुगल प्ले स्टोअर किंवा अन्य कोणत्या प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले नाही आहे.
हे वाचा- Corona vaccine घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका आहे का?
अशाप्रकारे करा CoWIN वर रजिस्ट्रेशन
CoWIN अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला हे अॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. यानंतर आवश्यक माहिती टाकून तुमचं नाव रजिस्टर करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे ओळखपत्र द्यावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus