नवी दिल्ली, 16 जानेवारी: देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला (corona vaccination campaign) रविवारी एक वर्ष पूर्ण (one-year anniversary) झालं. आतापर्यंत देशातील 156 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा (corona vaccine) डोस मिळाला आहे. त्यापैकी 76 कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आलं आहे. याशिवाय 65 कोटींहून अधिक लाभार्थींचे संपूर्ण लसीकरण झालं आहे. ग्रामीण भागातील कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 99 कोटी डोस देण्यात आले. याशिवाय 3 लाख 69 हजारांहून अधिक लसीचे डोस ट्रान्सजेंडर्सना देण्यात आलं.
आतापर्यंत 67 लाखांहून अधिक अशा लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही. कारागृहात आतापर्यंत 6 लाखांहून अधिक कैद्यांचं लसीकरण केलं आहे. तर आदिवासी जिल्ह्यांमध्ये 11 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्याच वेळी घराजवळील कोविड लसीकरण केंद्रांदरम्यान 40 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले.
15 ते 17 वर्षे वयोगटातील 3 कोटी मुलांना पहिला डोस
15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 दिवसांत 3 कोटींहून अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आला. आतापर्यंत 15 ते 17 वर्षे वयोगटातील 3.31 कोटी मुलांना पहिला डोस दिला आहे.
45 दिवसांचं लग्न; Video Call करुन पत्नीनं कापली नस, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल
भारतातील लसीकरण मोहिमेने ऑगस्ट २०२१ मध्ये वेग घेतला आणि सुरुवातीस संथ गती घेतली. मोहिमेसाठी सप्टेंबर महिना सर्वोत्तम ठरला, ज्यामध्ये सुमारे 24 कोटी लोकांना लसीकरण करण्यात आले. 1 डिसेंबरपासून दररोज सरासरी 68 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 36 दिवसांच्या विक्रमी वेळेत 25 कोटी लसी देण्यात आल्या होत्या.
21 ऑक्टोबर रोजी गाठला 100 कोटींचा आकडा
गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारताने 100 कोटी लसीकरण केलं होतं. यापूर्वी 7 ऑगस्ट 2021 रोजी देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटींवर पोहोचला होता. म्हणजेच सुमारे 80 दिवसांत देशातील 50 कोटी लोकांना लसीकरण करण्यात आलं.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.