Home /News /national /

कोरोनाची लस घेणाऱ्या हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांचा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह, वाचा नेमकं काय घडलं

कोरोनाची लस घेणाऱ्या हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांचा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह, वाचा नेमकं काय घडलं

कोरोनाची लस घेऊन अवघे 15 दिवस उलटले असतील तोच हरियाणाच्या आरोग्य मंत्र्य्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली, 5 डिसेंबर : कोरोनाची लस घेणाऱ्या भाजप मंत्र्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. माझा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात अंबाला कॅन्ट इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी कोरोना लशीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात अनिल वीज यांनी ही लस घेतली होती. राज्यातील कोरोना विषाणूच्या साथीच्या संरक्षणासाठी भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद कोवाक्सिन यांच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू झाली असून ही लस त्यांनी घेतली. लस घेऊन झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यावेळी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या कोरोना लशीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचा दावा कंपनीने केला होता. नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली त्यावेळी भारतात पहिल्यांदाच हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेत डोस घेतला. तिसऱ्या टप्प्यात 25 केंद्रांवर 26 हजार स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाची लस घेऊन अवघे 15 दिवस उलटले असतील तोच हरियाणाच्या आरोग्य मंत्र्य्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्री अनिल विज यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणी भारत बायोटेक कंपनीकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. भारत बायोटेक कंपनीनं जारी केलेल्या निवेदनानुसार हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी लशीचा केवळ एकच डोस घेतला होता. त्यांचा दुसरा डोस बाकी होता त्याआधीच त्यांना कोरोनाची लागण झाली. 14 दिवसांनंतर पुन्हा दुसरा डोस दिला जातो आणि त्यानंतर त्याचे परिणाम पाहिले जातात. दुसरा डोस घेतल्यानंतरच त्याचा परिणाम होतो असं देखील सांगण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या